कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय क्षेत्रातील एफपीओ योजनेअंतर्गत 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची स्थापना


1 जानेवारी 2026 पर्यंत, 10,000 एफपीओ या उपक्रमाचा भाग बनलेल्या महिला शेतकऱ्यांची संख्या 21.96 लाखांहून अधिक

प्रविष्टि तिथि: 06 FEB 2026 6:34PM by PIB Mumbai



भारत सरकारच्या 10,000 शेतकरी उत्पादक संस्थांची (एफपीओ) स्थापना आणि प्रोत्साहन' या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत, आतापर्यंत 10,000 एफपीओची स्थापना करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत नोंदणीकृत 10,000 एफपीओपैकी, 1,175 एफपीओ 100% महिला सदस्य असलेल्या संस्था आहेत.
1 जानेवारी, 2026 पर्यंत, '10,000 एफपीओची स्थापना आणि प्रोत्साहन' या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत नोंदणीकृत एकूण 56.32 लाख शेतकऱ्यांपैकी 21.96 लाख महिला शेतकरी आहेत.
कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2224678) आगंतुक पटल : 89
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi