दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

5G नेटवर्कवरील अनुप्रयोगांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने केल्या अनेक उपाययोजना

Posted On: 05 FEB 2026 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

राज्यसभेत आज एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दळणवळण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी सांगितले की, 5जी नेटवर्कवरील अनुप्रयोगांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. 5जी मुळे उच्च गतीची कनेक्टिव्हिटी, कमी विलंब (लो लेटन्सी) आणि मोठ्या संख्येने जोडल्या जाणाऱ्या उपकरणांना समर्थन मिळते, ज्यामुळे डिजिटल सेवा आणि स्वयंचलनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेनचा वापर शक्य होतो.

5जी युज केस लॅब्स उपक्रमांतर्गत 5जी इनोव्हेशन हॅकाथॉन 2025 सुरू करण्यात आला असून, 5जी, एआय आणि प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करून उपाययोजना विकसित करण्यास प्रोत्साहन दिले जाते. हे उपक्रम सामाजिक-आर्थिक उपयोग प्रकरणांचा विकास आणि क्षमतावृद्धी यांना पाठबळ देतात, तसेच नवोन्मेष, शैक्षणिक संस्था-उद्योग सहकार्य आणि आर्थिक वाढीसाठी शैक्षणिक व स्टार्ट-अप परिसंस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने राबवले जात आहेत.

याशिवाय, 5जी मध्ये प्रमाणीकरण, एन्क्रिप्शन आणि नेटवर्क आयसोलेशन यांसारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. सायबर सुरक्षेच्या आवश्यकता राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (एनएससीएस) यांच्या आदेशांनुसार अंमलात आणल्या जातात. उद्योगांकडून या मानकांचा अवलंब केल्याने सुरक्षा आणि नवोन्मेष यामध्ये संतुलन राखले जाते.

नेहा कुलकर्णी /गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2223963) अभ्यागत कक्ष : 16