आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष्मान वय वंदना कार्ड संदर्भात अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 03 FEB 2026 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026

आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) ही योजना भारताच्या तळागाळातील लोकसंख्येच्या 40% कुटुंबांना दरवर्षी दुय्यम श्रेणीच्या आणि तृतीय श्रेणीच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे आरोग्य रक्षण विमा कवच  प्रदान करते. ऑक्टोबर 2024 मध्ये, आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे या योजनेचा विस्तार झाला आणि 4.5 कोटी कुटुंबांमधील कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतल्या  70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना, विमा कवच प्रदान करण्यात आले.

दिनांक 31.12.2025 पर्यंत, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 96.73 लाखांहून अधिक आयुष्मान वय वंदना कार्ड तयार करण्यात आली आहेत.

दिनांक 31.12.2025 पर्यंत, आयुष्मान वय वंदना कार्ड लाभार्थ्यांपैकी एकूण 10.33 लाख लाभार्थ्यांची  रुग्णालय  भर्ती स्वीकृत   करण्यात आली आहे, ज्यासाठी 2,154.37 कोटी रुपये खर्च आला. अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 3.93 लाख रुग्णालय  भर्ती, ज्यासाठी 820.42 कोटी रुपये खर्च आला, तो महिला लाभार्थ्यांसाठी आहे आणि 6.40 लाख भर्ती, ज्याचा खर्च  1333.94 कोटी रुपये आहे, तो पुरुष लाभार्थ्यांसाठी झाला आहे 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

निलीमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2222856) आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil