संरक्षण मंत्रालय
दिवाकर जयंत यांनी नौदलाच्या शस्त्रास्त्र महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
03 FEB 2026 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026
दिवाकर जयंत, आयएनएएस यांनी 02 फेब्रुवारी 2026 रोजी संरक्षण मंत्रालयाच्या नौदल मुख्यालय, येथे नौदलाच्या शस्त्रास्त्र महासंचालक (डीजीओएनए) पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर पी. उपाध्याय कार्यरत होते. ते 31 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त झाले.
दिवाकर जयंत हे भारतीय नौदल शस्त्रास्त्र सेवेच्या 1991 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते 28 डिसेंबर 1992 रोजी भारतीय नौदलाच्या नौदल शस्त्रास्त्र संघटनेत रुजू झाले. आपल्या 33 वर्षांच्या सेवेमध्ये, त्यांनी त्यांनी मुंबई, विशाखापट्टणम आणि अलवे येथील नौदल शस्त्रास्त्र डेपोमध्ये आणि राष्ट्रीय मुख्यालय/संरक्षण मंत्रालयात मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक/प्रधान संचालक यासह विविध वरिष्ठ पदांवर काम केले.
आयआयटी दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेले, दिवाकर जयंत टॉर्पेडोच्या लाइफ-सायकल मॅनेजमेंटमध्ये तज्ञ आहेत. त्यांनी स्फोटक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या नियोजनात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच त्यांना मनुष्यबळ आणि प्रशासनाचे विस्तृत ज्ञान आहे. त्यांनी प्रतिष्ठित एपीपीपीए अभ्यासक्रम (2017-18) देखील पूर्ण केला आहे.
NUF0.jpg)
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2222841)
आगंतुक पटल : 55