गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सशस्त्र सीमा दलाचे आधुनिकीकरण

Posted On: 03 FEB 2026 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असताना सीमा सुरक्षा टेहळणी करण्यासाठी आणि आधुनिकीकरणासाठी मानवरहित हवाई वाहने, सूक्ष्म मानवरहित हवाई वाहने, हातात धरता येणारे थर्मल इमेजर, स्वयंचलित चेहरा ओळख प्रणाली आणि स्वयंचलित वाहन क्रमांक प्लेट ओळख प्रणालीसह सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याची प्रणाली आणि उपग्रह फोनची खरेदी केली आहे.

याव्यतिरिक्त सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांकरता “केंद्रीय क्षेत्र योजना – आधुनिकीकरण आराखडा” राबवण्यात आला असून त्यामध्ये सशस्त्र सीमा दलाचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांची कार्यक्षमता आणि कामगिरी यांमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने शस्त्रसज्जता, दळणवळण, संरक्षक साधने, नजर  ठेवण्याची आणि सीमा संरक्षण प्रणाली, प्रशिक्षण साहित्य, चिलखती वाहने तसेच विशेष वाहतूक वाहने या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक आणि  नव्या तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा समावेश करण्यात येत आहे.

दलांचे आधुनिकीकरण आणि अत्याधुनिक  उपकरणांची खरेदी ही निरंतर प्रक्रिया  आहे. त्यामुळे त्यासाठी ठराविक कालमर्यादा देता येणे शक्य नाही. 

आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासाकरता 2015-16 ते  2025-26 या दहा वर्षांच्या कालखंडात चालू आर्थिक वर्षाच्या समावेशासह, सशस्त्र सीमा दलाला  5001.63 कोटी रुपये देण्यात आले असून त्यापैकी 4775.11 कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले आहे आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत 31.03.2026 पर्यंत अधिक निधीचा वापर केला जाईल.

2013 ते सध्या सुरू असलेल्या आणि 31.03.2026 पर्यंत लागू असलेल्या चालू आधुनिकीकरण आराखडा–IV या कालावधीत, सशस्त्र सीमा दलाला  आधुनिकीकरण आराखडा–II, III आणि  IV अंतर्गत एकूण 241.15 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी   210.02 कोटी रुपये इतका निधी शस्त्रसज्जता, दळणवळण, संरक्षक साधने, पाळत ठेव आणि  सीमा संरक्षण प्रणाली, प्रशिक्षण साहित्य, चिलखती वाहने तसेच विशेष वाहतूक वाहने या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक आणि आधुनिक उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च करण्यात आला आहे.

सशस्त्र सीमा दलाचे मनुष्यबळ बळकट करण्यासाठी, (i) भरती नियमांनुसार पदोन्नती कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठी वेळोवेळी विभागीय पदोन्नती समिती  बैठका घेण्यात येतात,  (ii) थेट भरतीची पदे अधिसूचित करून कर्मचारी निवड आयोग  / संघ लोकसेवा आयोग / गृह मंत्रालय – संघटना निवड मंडळ / विभागीय पातळीवरून भरती करून ती भरली जातात (iii) नॉन-जीडी संवर्गातील पदे भरण्यासाठी अंतर्गत  भरती प्रक्रिया वेळेत राबविली जाते (iv) काही रिक्त पदे प्रतिनियुक्ती पद्धतीने भरली जातात. 

याशिवाय दलाच्या आवश्यकतेनुसार तसेच आधुनिक शस्त्रास्त्रे खरेदी केल्यास दलाची कार्यान्वयन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सीमा सुरक्षा दल,  आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. तसेच ड्रोनच्या प्रभावी वापरासाठी दलाने आपल्या कर्मचाऱ्यांना ड्रोन पायलट प्रशिक्षण घेण्यासाठीही पाठविले आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.


निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2222734) अभ्यागत कक्ष : 20