पंतप्रधान कार्यालय
‘विकास भी,विरासत भी' या मंत्राचा स्वीकार केल्याने त्रिपुराच्या विकासाच्या प्रवासाला कसा वेग प्राप्त झाला आहे यावर भर देणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
03 FEB 2026 3:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026
‘विकास भी, विरासत भी' या मंत्राचा स्वीकार केल्याने त्रिपुराच्या विकासाच्या प्रवासाला वेग प्राप्त झाला आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी 'एक्स'वर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी त्रिपुराच्या आपल्या अलीकडील भेटीतील अनुभव सामायिक केले आणि त्या राज्याचा बदलता चेहरा तसेच त्यातील प्रचंड क्षमता अधोरेखित केली. त्रिपुरा केवळ पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासातच नव्हे, तर आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यातही प्रगती करत आहे, असे त्यांनी यात नमूद केले आहे.
याला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदींनी एक्स वर म्हटले आहे:
‘विकास भी, विरासत भी' या मंत्राला आत्मसात करून, त्रिपुराने जलदगतीने प्रगती केली आहे आणि राज्य प्रगतीचे दररोज नवीन टप्पे गाठत आहे. केंद्रीय मंत्री @JM_Scindia यांनी त्रिपुराच्या त्यांच्या भेटीतील अनुभव सामायिक केले आणि राज्याच्या बदलत्या परीदृश्याबद्दल आणि अपार क्षमतेबद्दल सविस्तरपणे वर्णन केले आहे. त्यांचा लेख वाचा..."
निलीमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2222558)
आगंतुक पटल : 47
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam