रसायने व पेट्रोकेमिकल विभाग
केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये तीन नवीन रसायन पार्क्स निर्मितीचा प्रस्ताव
रसायन क्षेत्राला मदत करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांच्या खर्चासह कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज (CCUS) तंत्रज्ञान
Posted On:
01 FEB 2026 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2026
लोकसभेत सादर झालेल्या 2026-2027 वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात चॅलेंज रूटद्वारे आणि क्लस्टर-आधारित प्लग-अँड-प्ले मॉडेलवर आधारित तीन नवीन विशेष रसायन पार्क्स निर्मितीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
यामुळे देशांतर्गत रसायन निर्मितीला चालना मिळेल आणि आयातीवरील अवलंबित्व कमी होईल असे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. या तीन समर्पित रसायन पार्क्सच्या निर्मितीसाठी राज्यांना अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने एक योजना सुरु केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार, रसायन उद्योगासह पाच औद्योगिक क्षेत्रांमध्ये अंतिम वापराच्या अनुप्रयोगांमध्ये उच्च सज्जता पातळी गाठण्यासाठी कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज तंत्रज्ञान लागू केले जाईल. या श्रेणीमध्ये अर्थसहाय्याकरता ऊर्जा, पोलाद, सिमेंट आणि शुद्धीकरण क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज तंत्रज्ञानांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील पाच वर्षांत 20,000 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
हरित उपक्रमाअंतर्गत कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज योजनेचे उद्दिष्ट कार्बनची साठवणूक करुन किंवा त्याचा पुनर्वापर करुन कार्बन उत्सर्जन कमी करणे असा आहे, ज्यामुळे कॅप्चर केलेला कार्बन परत वातावरणात सोडला जाणार नाही.
केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 मध्ये पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या उन्नतीकरणाद्वारे मूल्य स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी 200 जुन्या औद्योगिक समूहांना पुनरुज्जीवित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेमुळे रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रालाही मदत होणार आहे.
आर्थिक वृद्धी कायम राखणे आणि तिला गती देण्यासह रोजगारांचे रक्षण करण्यासाठी जुन्या औद्योगिक समूहांना पुनरुज्जीवित करुन त्यांना सक्षम करणे गरजेचे आहे, असे केंद्रीय वित्तमंत्री म्हणाल्या.
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2222125)
अभ्यागत कक्ष : 5