पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांच्या हस्ते हलवारा विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन; पंजाब विशेषतः लुधियाना आणि आसपासच्या परिसरासाठी हा आनंदाचा क्षण असल्याची भावना केली व्यक्त
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2026 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हलवारा विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. हा क्षण पंजाबच्या जनतेसाठी, विशेषतः लुधियाना आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. लुधियाना हे उत्तर भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यापारी केंद्र असून या शहराचा विमान सेवा संपर्क सुधारण्यासाठी सरकार अथक परिश्रम करत आहे आणि आधुनिक विमानतळाचे सुरू असलेले काम त्याचेच प्रतिबिंब आहे, असे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधानांनी 'X' या समाजमाध्यमावरील आपल्या टिप्पणीत म्हटले आहे:
"हलवारा विमानतळावरील टर्मिनल इमारतीचे उद्घाटन हा पंजाबच्या लोकांसाठी, विशेषतः लुधियाना आणि आसपासच्या भागासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, लुधियाना हे उत्तर भारतातील एक महत्त्वाचे औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र आहे. हे शहर येथील उद्यमशील लोकांसाठी ओळखले जाते. आमचे सरकार या शहराचा विमान सेवा संपर्क सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे आणि आधुनिक विमानतळाचे सुरू असलेले काम हे त्याचेच प्रतिबिंब आहे."
"ਹਲਵਾਰਾ ਹਵਾਈ ਅੱਡੇ 'ਤੇ ਟਰਮੀਨਲ ਇਮਾਰਤ ਦਾ ਉਦਘਾਟਨ ਪੰਜਾਬ ਦੇ ਲੋਕਾਂ, ਖ਼ਾਸ ਕਰਕੇ ਲੁਧਿਆਣਾ ਅਤੇ ਨਜ਼ਦੀਕੀ ਇਲਾਕਿਆਂ ਲਈ ਬੇਹੱਦ ਖ਼ੁਸ਼ੀ ਦਾ ਮੌਕਾ ਹੈ। ਜਿਵੇਂ ਕਿ ਅਸੀਂ ਸਾਰੇ ਜਾਣਦੇ ਹਾਂ, ਲੁਧਿਆਣਾ ਉੱਤਰੀ ਭਾਰਤ ਦਾ ਅਹਿਮ ਸਨਅਤੀ ਅਤੇ ਵਪਾਰਕ ਕੇਂਦਰ ਹੈ। ਇਹ ਸ਼ਹਿਰ ਆਪਣੇ ਉੱਦਮੀ ਲੋਕਾਂ ਕਰਕੇ ਜਾਣਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਸਾਡੀ ਸਰਕਾਰ ਇਸ ਸ਼ਹਿਰ ਦਾ ਹਵਾਈ ਸੰਪਰਕ ਬਿਹਤਰ ਬਣਾਉਣ ਲਈ ਅਣਥੱਕ ਮਿਹਨਤ ਕਰ ਰਹੀ ਹੈ, ਜੋ ਆਧੁਨਿਕ ਹਵਾਈ ਅੱਡੇ ਲਈ ਚੱਲ ਰਹੇ ਕੰਮਾਂ ਵਿੱਚ ਸਾਫ਼ ਝਲਕਦੀ ਹੈ।"
* * *
निलिमा चितळे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221884)
आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam