पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आव्हानात्मक जागतिक वातावरणात देशाची स्थिर प्रगती दर्शवणारे आर्थिक सर्व्हेक्षण म्हणजे 'सुधारणेच्या एक्सप्रेसचे सर्वसमावेशक चित्र’  असल्याचे पंतप्रधानांनी केले अधोरेखित 

प्रविष्टि तिथि: 29 JAN 2026 7:43PM by PIB Mumbai

 

 नवी दिल्ली - दि. 29 जानेवारी, 26.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी म्हणाले की, आज सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाने भारताच्या 'सुधारणेच्या एक्सप्रेसचे सर्वसमावेशक चित्र’  सादर केले आहे.  आव्हानात्मक जागतिक वातावरणातही देशाची स्थिर प्रगती या सर्व्हेक्षणातून दिसून येते. पंतप्रधान  मोदी यांनी नमूद केले की, आर्थिक सर्व्हेक्षण मजबूत समग्र आर्थिक  मूलभूत तत्त्वे, शाश्वत वाढीची गती आणि राष्ट्र उभारणीमध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांची वाढती भूमिका अधोरेखित करते. "हे सर्वेक्षण सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित करते, त्यामध्ये शेतकरी, एमएसएमई, युवा रोजगार आणि सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. हे उत्पादन मजबूत करण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि विकसित भारत बनण्याच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करण्यासाठीचा आराखडा देखील मांडते," असे  मोदी म्हणाले.

केंद्रीय मंत्री  निर्मला सीतारामन यांच्या 'एक्स'वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान  मोदी म्हणाले:

"आज सादर केलेले आर्थिक सर्वेक्षण भारताच्या 'सुधारणेच्या एक्सप्रेस'चे सर्वसमावेशक चित्र सादर करते, जे आव्हानात्मक जागतिक वातावरणात स्थिर प्रगती दर्शवते.

हे मजबूत समग्र अर्थशास्त्राची मूलभूत तत्त्वे, शाश्वत वाढीची गती आणि राष्ट्र उभारणीमध्ये नवोपक्रम, उद्योजकता आणि पायाभूत सुविधांची वाढती भूमिका अधोरेखित करते. हे सर्वेक्षण सर्वसमावेशक विकासाचे महत्त्व अधोरेखित करते, त्यामध्ये शेतकरी, एमएसएमई, युवा रोजगार आणि सामाजिक कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे उत्पादन क्षेत्राला  बळकट  करण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी आणि विकसित भारत बनण्याच्या दिशेने आपला प्रवास वेगवान करण्यासाठीचा आराखडा देखील मांडते.

या सर्वेक्षणाद्वारे  मिळालेल्या माहितीमुळे सुजाण धोरणनिर्मितीसाठी  मार्गदर्शन मिळेल आणि भारताच्या आर्थिक भवितव्यावरील विश्वास दृढ होईल.’’

 ***

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2220558) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam