गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील बारामती येथे अजित पवार जी यांचे अखेरचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली
गृहमंत्र्यांनी बारामती येथे अजित पवार जी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले
केंद्रीय गृहमंत्र्यांनी शरद पवार जी यांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या
समाज आणि जनतेसाठी समर्पित अजित पवार जी यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात अशी पोकळी निर्माण झाली आहे की जी भरून निघणे नजीकच्या काळात शक्य नाही
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2026 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील बारामती येथे अजित पवार जी यांचे अखेरचे दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
एक्स वरील पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “अजित पवार जी यांचे अखेरचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. समाज आणि जनतेसाठी समर्पित अजित पवार जी यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात अशी पोकळी निर्माण झाली आहे की ती इतक्यात भरून निघणे शक्य होणार नाही.”
केंद्रीय गृहमंत्र्यांनी बारामती येथे अजित पवार यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. गृहमंत्र्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.


* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2220358)
आगंतुक पटल : 28