पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
प्रविष्टि तिथि:
28 JAN 2026 11:16AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्यासाठी सदैव अग्रभागी राहणारे अतिशय मेहनती नेते म्हणून अजित पवार यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय कामांची त्यांची जाण आणि गरीब आणि वंचितांना सक्षम करण्यासाठीची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी होती. "त्यांचे अकाली निधन ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद बाब आहे. त्यांचे कुटुंब आणि अगणित चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे." असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले लोकनेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. महाराष्ट्रातील लोकांची सेवा करण्यासाठी सदैव अग्रभागी राहणारे अतिशय मेहनती नेते म्हणून अजित पवार यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती."
"श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती."
***
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219499)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam