महिला आणि बालविकास मंत्रालय
प्रजासत्ताक दिन 2026 सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून 200 हून अधिक अंगणवाडी कर्मचारी आणि अन्य कार्यकर्ते महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून आमंत्रित
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2026 9:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2026
दिल्लीत कर्तव्य पथावर आज (26 जानेवारी 2026) रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून 200 हून अधिक अंगणवाडी कर्मचारी आणि आघाडीवरील क्षेत्र स्तरावरील कार्यकर्त्यांचे त्यांच्या जोडीदारांसह विशेष पाहुणे म्हणून स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा वितरण बळकट करणे आणि लोककेंद्रित विकास प्रारूप तयार करण्याच्या दृष्टीकोनाला अनुसरून, तळाच्या स्तरावरच्या महिला आणि मुलांच्या सक्षमीकरण आणि कल्याणासाठी, या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदर्श आणि सातत्यपूर्ण योगदानाच्या सन्मानार्थ त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

देशभरातून आलेल्या विशेष पाहुण्यांचे 24 ते 27 जानेवारी 2026 दरम्यान दिल्लीत आदरातिथ्य करण्यात आले. या कार्यक्रमाचा भाग म्हणून, पंतप्रधान संग्रहालय आणि अक्षरधाम मंदिरासह प्रमुख राष्ट्रीय स्थळांचे दर्शन घडवीत या पाहुण्यांना भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विकास प्रवास अनुभवण्याची एक अनोखी संधी देण्यात आली.
25 जानेवारी 2026 रोजी मंत्रालयाने केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, महिला आणि बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक यांच्या उपस्थितीत एका सुसंवाद सत्राचे आयोजन केले होते. या विशेष पाहुण्यांशी मंत्र्यांनी संवाद साधला आणि त्यांच्या समर्पण वृत्तीचे कौतुक केले तसेच तळाच्या स्तराच्या संस्था आणि आघाडीचा सेवा पुरवठा बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार केला.

उपस्थितांना संबोधित करताना अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रनिर्माणातील प्रमुख भागीदार म्हणून ओळख मिळाली आहे. देशभरातली महिला आणि मुलांसाठी सरकारी योजना सार्थ परिणामांमध्ये रुपांतरीत करण्यासाठी तळागाळातील स्तरावरील त्यांचे समर्पण महत्त्वाचे ठरले आहे."
राज्यमंत्री सावित्री ठाकूर म्हणाल्या, "आपल्या आघाडीच्या कर्मचाऱ्यांची बांधिलकी आणि सेवा हे विकसित भारताच्या खऱ्या भावनेचे प्रतिबिंब दर्शवते."

* * *
निलिमा चितळे/विजयालक्ष्मी साळवी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218919)
आगंतुक पटल : 6