संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण तुकडीने इंडोनेशियामध्ये दृढ केले सागरी संबंध
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2026 12:14PM by PIB Mumbai
हिंदी महासागर नौदल परिसंवाद इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम-आय.ओ.एन.एस) या संघटनेमधील सदस्य देश असलेल्या इंडोनेशियासोबत सागरी सहभाग वाढवण्यासाठी आणि भारतीय नौदलाच्या 'महासागर' (MAHASAGAR) संकल्पनेला पुढे नेण्यासाठी, भारतीय नौदलाची 'पहिली प्रशिक्षण तुकडी' (1टीएस) 23 जानेवारी 2026 रोजी बेलावान (Belawan) बंदरातून मार्गस्थ झाली. आपल्या तीन दिवसांच्या मुक्कामादरम्यान, आयएनएस तीर, शार्दुल , सुजाता आणि आयसीजीएस सारथी हे भारतीय तटरक्षक दलाचे जहाज, यां मधील कर्मचारी आणि शिकाऊ उमेदवारांनी इंडोनेशियन नौदलासोबत विविध स्तरांवर संवाद साधला. या भेटीत व्यावसायिक संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण, प्रशिक्षण भेटी आणि मैत्रीपूर्ण क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या द्वारे, दोन्ही देशांमधील परस्पर सामंजस्य आणि मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले.
1 टी एस या प्रशिक्षण तुकडीचे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन तिजो के. जोसेफ आणि जहाजांच्या कमांडिंग ऑफिसर्सनी 'नेव्हल एरिया कमांड I' चे कमांडर रिअर ॲडमिरल लक्ष्मण मुदा डेनी सप्तियाना यांची भेट घेतली. यावेळी भारतीय आणि इंडोनेशियन नौदलातील सामायिक सागरी हितसंबंधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रशिक्षण तुकडीचे वरिष्ठ अधिकारी आणि मेदानमधील भारताचे महावाणिज्य दूत यांच्या संयुक्त विद्यमाने जहाजावर एका स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला इंडोनेशियन नौदलाच्या 'कोडेराल I' मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर कोलोरनेल विरावन अबी पी. हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या समारंभामुळे दोन्ही नौदलांमधील व्यावसायिक संबंध आणि सदिच्छा वृद्धिंगत करण्यास मदत झाली. व्यावसायिक उपक्रमां अंतर्गत भारतीय शिकाऊ उमेदवारांना इंडोनेशियन नौदलाच्या प्रादेशिक कमांडमधील विविध सुविधांची माहिती देण्यात आली. त्यामुळे त्यांना या क्षेत्रातील कमांडच्या भूमिका आणि कार्यांची जवळून ओळख झाली. याशिवाय, इंडोनेशियन नौदलाच्या जवानांसोबत मैत्रीपूर्ण खेळ आणि संयुक्त योगासने आयोजित करण्यात आली होती, ज्यातून उभय पक्षांमधील सौहार्द आणि सदिच्छा वाढली. ही जहाजे शालेय मुलांसाठी खुली करण्यात आली होती, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जहाजांच्या सफरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह आणि कुतूहल दिसून आले. यामुळे ही भेट त्यांच्यासाठी प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरली.
या प्रशिक्षण तुकडीची इंडोनेशियातील ही तैनात दोन्ही राष्ट्रांमधील जुने सागरी संबंध दर्शवते. तसेच, सागरी उपस्थिती आणि सहकार्य वाढवून भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' अर्थात पूर्वेकडच्या देशांना प्राधान्य या धोरणाला, आग्नेय आशिया आणि हिंदी महासागर क्षेत्रात अधिक बळकटी देते. भारतीय नौदलाची ही भेट, मैत्री दृढ करण्यासाठी, प्रशिक्षणाचा अनुभव समृद्ध करण्यासाठी आणि एक स्थिर, सुरक्षित आणि सहयोगी सागरी वातावरण राखण्यासाठी असलेल्या वचनबद्धतेवर भर देते.
(2)HTH8.jpeg)
8NMS.jpeg)
(1)PX9D.jpeg)
***
शैलेश पाटील/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218494)
आगंतुक पटल : 16