जलशक्ती मंत्रालय
2026 च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतातील नद्या आणि नदी रक्षकांना अभिवादन
बंदिस्त जागांना भारतातील नद्यांची नावे देण्यासोबतच नदी संवर्धन करणारे समुदाय आणि गंगा प्रहरींचा राष्ट्रीय सोहळ्यात सहभाग
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2026 2:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 25 जानेवारी 2026
संस्कृतींचे "जीवन" आणि सामूहिक वारसा तसेच सांस्कृतिक विविधतेचे भांडार असलेल्या नद्या संस्कृतीचे मूलभूत प्रतीक आहेत. या वर्षी राबविण्यात येणाऱ्या अनोख्या उपक्रमांतर्गत, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनावेळी प्रेक्षकांना बसण्यासाठी तयार केलेल्या वेगवेगळ्या बंदिस्त जागांना देशभरातून वाहणाऱ्या नद्यांची म्हणजेच बियास, ब्रह्मपुत्र, चंबळ, चिनाब, गंडक, गंगा, घागरा, गोदावरी, सिंधू, झेलम, कावेरी, कोसी, कृष्णा, महानदी, नर्मदा, पेन्नार, पेरियार, रावी, सोन, सतलज, तीस्ता, वैगई आणि यमुना अशी नावे देण्यात आली आहेत .
नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलन 2026 ला एकूण 163 जल योद्धे जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग (डीओडब्ल्यूआर,आरडी आणि जीआर) यांचे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये उत्तराखंडमधील 28, झारखंडमधील 10, बिहारमधील 40 आणि उत्तर प्रदेशातील 85 व्यक्तींचा समावेश आहे.
गंगा प्रहरी - नदी संरक्षक हे स्थानिक समुदायातील प्रेरित आणि प्रशिक्षित स्वयंसेवक गंगा नदीतील जैवविविधतेच्या संवर्धनाचे आणि स्वच्छतेचे काम करतात. गंगा नदीची निर्मळ आणि अविरल धारा पूर्ववत करणे आणि नदीची पर्यावरणीय अखंडता जपणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. गंगा स्वच्छता राष्ट्रीय अभियान आणि भारतीय वन्यजीव संस्थेच्या संयुक्त सहकार्याने हे काम सुरू आहे.
गंगा प्रहरींव्यतिरिक्त, डॉल्फिन, कासव इत्यादी जलचर प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन तसेच नदी संवर्धन आणि सामुदायिक संपर्क यामध्ये वैयक्तिकरीत्या कार्यरत असलेले नागरिक/स्वयंसेवी संस्थांनाही प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याने त्यांच्या सामुदायिक योगदानाचे कौतुकच नाही तर ग्रामीण नागरिकांना कर्तव्य पथावरील ऐतिहासिक महत्त्वाच्या राष्ट्रीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी देखील त्यांना दिली गेली आहे. त्यांची उपस्थिती लोकसहभागाचा आणि राष्ट्रीय विकास प्रयत्नांचे मध्यवर्ती घटक म्हणून सामुदायिक सहभागाचा संदेश अधिक दृढ करेल. या विशेष पाहुण्यांची पेरियार एन्क्लोजरमध्ये आसनव्यवस्था केली जाईल.
व्ही. एल. कांथा राव, सचिव, डीओडब्ल्यूआर, आरडी आणि जीआर हे घाघरा एन्क्लोजरमधून प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सहभागी होतील.
हे विशेष पाहुणे 27 जानेवारी रोजी जलशक्ती खात्याचे मंत्री सी.आर. पाटील आणि व्ही. सोमण्णा आणि राजभूषण चौधरी या दोन राज्यमंत्र्याशी संवाद साधणार आहेत.
गंगा प्रहरींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी: https://share.google/X4KqXT1y8Hd9be1QD




***
शैलेश पाटील/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218482)
आगंतुक पटल : 23