पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त अर्पण केली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
24 JAN 2026 8:53AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि भारतरत्न पुरस्कारप्राप्त कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
पंतप्रधानांनी सांगितले की समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांचे उत्थान हे कर्पूरी ठाकूर यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी नेहमीच होते. त्यांनी नमूद केले की जननायक कर्पूरी ठाकूर यांची साधेपणा आणि आयुष्यभर लोकसेवेसाठी केलेल्या समर्पणासाठी कायम आठवण ठेवली जाईल आणि ते सर्वांसाठी आदर्श ठरतील.
एक्स वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“बिहारचे माजी मुख्यमंत्री, भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर नमन. समाजातील शोषित, वंचित आणि दुर्बल वर्गांचे उत्थान हे नेहमीच त्यांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या साधेपणा आणि जनसेवेप्रती असलेल्या समर्पणामुळे ते सदैव स्मरणीय आणि अनुकरणीय राहतील.”
***
अंबादास यादव/ डॉ गजेंद्र देवडा
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218067)
आगंतुक पटल : 4