पंतप्रधान कार्यालय
पराक्रम दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या साहस व शौर्य याबद्दलच्या आदर्शांचे स्मरण करत संस्कृत सुभाषित सामायिक केले
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2026 9:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, कि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून आपल्याला खऱ्या अर्थाने वीरता व शौर्याची शिकवण मिळते. पराक्रम दिवसानिमित्त देश नेताजींचे अदम्य साहस, त्याग व मातृभूमीप्रती त्यांच्या अविचल निष्ठेचे स्मरण करत आहे .
शौर्याच्या परमोच्च आदर्शांचे दर्शन घडवणारा एक संस्कृत श्लोक पंतप्रधांनीं सामायिक केला आहे.
“एतदेव परं शौर्यं यत् परप्राणरक्षणम्। नहि प्राणहरः शूरः शूरः प्राणप्रदोऽर्थिनाम्॥
दुसऱ्यांचे जीवरक्षण करण्यातच उच्च प्रतीचे शौर्य आहे, जो जीव घेतो तो शूर नाही, पण जो जीवन देतो व गरजवंतांचे रक्षण करतो तोच खरा वीर आहे , असा या सुभाषिताचा अर्थ आहे.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले,
“नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन आपल्याला शौर्य आणि वीरतेचा खरा अर्थ काय असतो, हे शिकवते. पराक्रम दिवस आपल्याला याचीच आठवण करून देतो.
एतदेव परं शौर्यं यत् परप्राणरक्षणम्।
नहि प्राणहरः शूरः शूरः प्राणप्रदोऽर्थिनाम्॥”
***
NehaKulkarni/UmaRaikar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217605)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam