कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एमएसडीई ने जागतिक आर्थिक मंचासोबत केला ऐतिहासिक सामंजस्य करार
प्रविष्टि तिथि:
22 JAN 2026 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2026
कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षणात बहुपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (एमएसडीई) भारताची कौशल्ये आणि तांत्रिक तसेच व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिसंस्था मजबूत करण्याबाबत सहकार्य करण्यासाठी ‘डब्ल्यूईएफ’ म्हणजेच जागतिक आर्थिक मंचाबरोबर सामंजस्य करार केला आहे.
या सामंजस्य कराराद्वारे, एमएसडीई जागतिक आर्थिक मंचासोबत सहकार्य करून भारतात एक ‘स्किल्स ऍक्सीलेटर’ सुरू करून त्याची अंमलबजावणी करेल, जो एक बहु-हितधारक मंच आहे. या केंद्राचा उद्देश मनुष्यबळातील महत्त्वाच्या कौशल्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी अभिनव उपाय आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारीचा शोध घेणे आणि त्याला गती देणे हा आहे.
याबाबत, कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि शिक्षण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) जयंत चौधरी म्हणाले, "भारताच्या कौशल्य परिसंस्थेला कामाच्या भविष्याशी संरेखित करण्यासाठी एक धोरणात्मक दृष्टीकोन म्हणून ज्याची सुरुवात झाली होती ते आता संरचित आणि जागतिक वित्तपुरवठा आणि आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देऊन जागतिक श्रम बाजारपेठेच्या मागणीशी संरेखित केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि व्हिजन इंडिया @2047 शी संरेखित हा दृष्टिकोन समावेशक विकास आणि राष्ट्रीय परिवर्तनाचा एक मध्यवर्ती स्तंभ म्हणून कौशल्याला बळकटी देतो."
या घोषणेबाबत बोलताना शिक्षण राज्यमंत्री सुकांता मजुमदार म्हणाले, “भारतात स्किल्स अॅक्सिलरेटर सुरू करण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि जागतिक आर्थिक मंच यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य कराराचे मी मनापासून स्वागत करतो.
स्किल्स अॅक्सिलरेटर भारताच्या व्हिजन @2047 आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या अनुषंगाने आजीवन शिक्षण, कौशल्य विकास आणि कौशल्य वृद्धीला प्रोत्साहन देऊन कौशल्यांमधील त्रुटी धोरणात्मकरित्या दूर करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
या सहकार्याचा भाग म्हणून, वेगवान कौशल्यविकासासाठी नवोन्मेषी वित्तपुरवठा यंत्रणांना पाठबळ मिळेल, प्रमुख भागधारकांमधील धोरणात्मक समन्वय सक्षम होईल, तसेच विविध व्यवसाय आणि रोजगार क्षेत्रांमधील उदयोन्मुख जागतिक मागणी व पुरवठ्याच्या स्थिती ओळखून आंतरराष्ट्रीय रोजगारक्षमता वाढविण्यास मदत होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, हरित ऊर्जा, सायबर सुरक्षा आणि प्रगत वस्तुनिर्माण यांसारख्या ‘भविष्यातील कामकाज’ क्षेत्रांतील उदयोन्मुख विभागांमध्ये सहकार्यावर विशेष भर देण्यात येईल. यासोबतच हॅकाथॉनसारख्या नवोन्मेषाधारित उपक्रमांसह संरचित कृती आराखड्याची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे.
हा करार आंतरमंत्रालयीन सक्षम समन्वयाचे प्रतीक आहे. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय हे जागतिक भागीदारीमार्फत भारताच्या कौशल्य विकास आणि व्यावसायिक शिक्षणाच्या कार्ययोजना पुढे नेण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
हे सहकार्य भारत आणि जागतिक आर्थिक मंच यांच्या संबंधांतील नवीन अध्याय आहे. हे सहकार्य स्वित्झर्लंडमधील दावोस-क्लोस्टर्स इथं जानेवारी 2025 मध्ये झालेल्या 55 व्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत भारताच्या सहभागादरम्यान निर्माण झालेल्या गतीवर आधारित आहे. या बैठकीत कौशल्य विकासाला समावेशी वाढ आणि जागतिक सहकार्याचा महत्त्वाचा स्तंभ म्हणून अधोरेखित करण्यात आले होते.
जागतिक आर्थिक मंचासोबतच्या या भागीदारीद्वारे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय सुधारणा वेगाने पुढे नेण्याचे, जागतिक संबंध दृढ करण्याचे आणि भारताला कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषासाठी आघाडीचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. यामुळे पुढील दशकांसाठी लवचिक, समावेशी आणि भविष्यासाठी सक्षम कार्यदल तयार होईल.
* * *
सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/सुषमा काणे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217458)
आगंतुक पटल : 6