युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची क्षमता सिद्ध केल्याबद्दल क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी लडाखची प्रशंसा केली
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2026 8:19PM by PIB Mumbai
लेह (लडाख)/नवी दिल्ली, 20 जानेवारी 2026
मंगळवारी लेह येथे नवांग दोरजे स्टोबदान (एनडीएस) स्टेडियममध्ये सहाव्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली. स्केटिंग आणि हॉकीसारख्या, बर्फावरील क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या लडाख येथे सुरू असलेल्या हिवाळी क्रीडा स्पर्धेचा टप्पा 26 जानेवारी रोजी संपन्न होईल. लडाख या केंद्रशासित प्रदेशात तिसऱ्यांदा खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा बर्फावरील टप्पा या वर्षाच्या उत्तरार्धात जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग येथे आयोजित केला जाईल.

पारंपरिक संगीत आणि नृत्याने सजलेल्या तसेच आर्मी XI आणि यूटी लडाख यांच्यातील आइस हॉकीच्या प्रात्यक्षिक सामन्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या रंगारंग उद्घाटन समारंभात, लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 चे उद्घाटन होत असल्याचे घोषित केले.
https://www.instagram.com/reel/DTuSGOTgaM1/?igsh=NmphdzlpbWpyaGYw
केंद्रीय युवा व्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी लडाख साठी दिलेल्या संदेशात म्हटले आहे: "खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांचे पुन्हा एकदा यशस्वी आयोजन केल्याबद्दल आणि हिवाळी खेळांचे भवितव्य हिमालयातून आकाराला येत आहे, हे आत्मविश्वासाने आणि पूर्ण क्षमतेने सिद्ध केल्याबद्दल मी लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे अभिनंदन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, लडाख हे उद्दिष्ट केंद्रित धोरण, पायाभूत सुविधांचा विकास आणि स्थानिक वचनबद्धता यातून काय साध्य होऊ शकते, याचे प्रतीक म्हणून उदयाला आले आहे. या खेळांचे आयोजन ज्या पद्धतीने करण्यात आले आहे, त्यावरून राष्ट्रीय स्तरावर एक स्पष्ट संकेत मिळतो, की हिवाळी खेळ आता भारताच्या स्पर्धात्मक क्रीडा चौकटीचा अविभाज्य भाग आहेत, आणि ते गांभीर्याने, मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकालीन हेतूने आयोजित केले जातील.”

डॉ. मांडवीय पुढे म्हणाले, “खेळाडूंना सखोलता, सातत्य आणि उच्च-गुणवत्तेचा स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2026 ची आखणी दोन टप्प्यांची स्पर्धा म्हणून करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात लेहमधील बर्फातील खेळांचा समावेश असून त्यानंतर फेब्रुवारीमध्ये जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात गुलमर्ग येथे बर्फावरील स्पर्धा आयोजित केल्या जातील. ही रचना खेळाडूंना आंतरराष्ट्रीय हिवाळी खेळांच्या मानकांशी जुळणाऱ्या विविध भूभागांवर आणि परिस्थितीत स्वतःची चाचणी घेण्याची संधी देते.”
https://www.instagram.com/p/DTulPhogXEB/?igsh=cjZ3cnRoemJnZDBx
For more on KIWG: please click www.Winter.kheloindia.gov.in
* * *
सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216627)
आगंतुक पटल : 5