संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रजासत्ताक दिन संचलन 2026 साठी भारतीय नौदलाच्या वतीने माध्यमांसाठी पूर्व झलक कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 20 JAN 2026 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2026

 

भारतीय नौदलाने आज दि. 20 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन संचलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांसाठी पूर्व झलक विषयक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान माध्यमांना कर्तव्य पथावरील राष्ट्रीय उत्सवात सहभागी होणाऱ्या नौदलाचे संचलन पथक, चित्ररथ आणि बँड यांबद्दलची माहिती देण्यात आली.

पथकाचे कमांडर लेफ्टनंट करण नग्याल यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. प्रजासत्ताक दिन संचलन हे देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविधता, लष्करी पराक्रम आणि तांत्रिक प्रगतीची प्रचिती देणारे एकतेचे भव्य दर्शन आहे. प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीट सोहळ्यातील नौदलाचे सर्व घटक हे, विकसित आणि समृद्ध भारतासाठी समुद्राचे रक्षण करणारी, युद्धसज्ज, संघटित आणि आत्मनिर्भर शक्ती या भारतीय नौदलाच्या संकल्पनेला अनुसरून, नौदलाची राष्ट्रीय सुरक्षेप्रती असलेली वचनबद्धता दर्शवतात असे त्यांनी सांगितले.

संचलन पथक: भारतीय नौदलाच्या संचलन पथकामध्ये यावर्षी 144 युवा नौसैनिक सहभागी होणार असून, ते ऐतिहासिक कर्तव्य पथावर खांद्याला खांदा लावून संचलन करतील. हे पथक नौदलाचे प्रगत आणि सामर्थ्यवान सागरी शक्तीचे प्रतीक असणार आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील नाविकांचा समावेश असलेले हे पथक एका अशा एका लघुरुपातील भारताचे प्रतिनिधित्व करणारे असेल. या पथकातील सहभागी सदस्यांचे सरासरी वय 25 वर्षे असून, या सगळ्यांची भारतीय नौदलातून अत्यंत विचारपूर्वक निवड केली गेली आहे. या सगळ्यांनी संचलनासाठी दोन महिन्यांहून अधिक काळ विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

या पथकाचे नेतृत्व कमांडर म्हणून लेफ्टनंट करण नग्याल करणार असून, लेफ्टनंट पवन कुमार गांधी, लेफ्टनंट प्रीती कुमारी आणि लेफ्टनंट वरुण ड्रेव्हेरिया हे प्लाटून कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळतील.

नौदलाचा चित्ररथ: राष्ट्रीय हितसंबंधांच्या रक्षणाचा इतिहास असलेल्या भारतीय नौदलाचा प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मधील चित्ररथ सामर्थ्यवान राष्ट्रासाठी सामर्थ्यवान नौदल या संकल्पनेवर साकारलेला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून इसवी सन 5 व्या शतकातील स्टिच्ड शिप (शिवलेले जहाज), ज्याचे आता आयएनएसव्ही कौंडिण्य (INSV Kaundinya) असे नामकरण करण्यात आले आहे हे जहाज, मराठा आरमारातील गुराब श्रेणीतील जहाजे आणि आयएनएस विक्रांत ही युद्धनौका, प्रोजेक्ट 17A अंतर्गत निलगिरी श्रेणीतील स्टेल्थ फ्रिगेट्स आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी, कलवरी श्रेणीतील पाणबुडी आणि GSAT-7R (प्रोजेक्ट रोहिणी) दळणवळण उपग्रह यांसह आघाडीच्या स्वदेशी घटकांचे दर्शन घडवले जाणार आहे.

या चित्ररथात नाविका सागर परिक्रमा-II मोहिमेचा भाग म्हणून आयएनएसव्ही तारिणीने केलेल्या परिक्रमेच्या मार्गाचे चित्रण देखील आहे. नौदल कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, मुंबईतील तरुणांना मूलभूत समुद्री कौशल्ये शिकवणाऱ्या सी कॅडेट कॉर्प्स या स्वयंसेवी संस्थेचे तरुण कॅडेट्स चित्ररथाबरोबर संचलन करतील.

नौदलाचे बँड पथक- एमसीपीओ म्युझिशियन फर्स्ट क्लास एम अँथनी राज, हे 80 वादकांचा समावेश असलेल्या भारतीय नौदलाच्या बँड पथकाचे नेतृत्व करतील. 29 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या 'बीटिंग द रिट्रीट' सोहळ्यादरम्यान, बँड पथक विविध रचना आणि मनमोहक, ताल धरायला लावणाऱ्या सुरांचे सादरीकरण करेल, विविध सांगीतिक रचना त्याला साथ देतील. बँडमध्ये सहा महिला अग्निवीर वादकांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय नौदलाचा सहभाग हा केवळ लष्करी क्षमतेचे प्रदर्शन नाही, तर आत्मनिर्भरता वाढवण्याच्या नौदलाच्या दृढ निश्चयांचे प्रतिबिंब आहे, असे कंट्रोलर पर्सनल सर्व्हिसेस, व्हाइस ॲडमिरल प्रवीण नायर यांनी सांगितले. 'परंपरेवर आधारित, स्वावलंबन आणि नवोन्मेषाच्या दिशेने प्रवास' या संकल्पनेवर आधारित नौदलाचा चित्ररथ, पंतप्रधानांच्या 'समुद्र से समृद्धी' हा दृष्टिकोन मांडतो, आणि तो भारताच्या प्राचीन जहाजबांधणी परंपरेपासून, ते भविष्यासाठी सज्ज असलेल्या स्वदेशी दलापर्यंतचा प्रवास दर्शवतो. ते म्हणाले की, हा चित्ररथ लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांच्या नेतृत्वाखालील आयएनएसव्ही तारिणीवरील 'नाविका सागर परिक्रमा-II' चमूने केलेल्या जगप्रवासाच्या मार्गाचे चित्रण करून, ‘कृतीमधून महिला सक्षमीकरण’ दर्शवतो. तसेच, 1980 च्या दशकात प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भाग घेतलेल्या सी कॅडेट कॉर्प्समधील मुलींचा यंदाच्या संचलनात पुन्हा सहभाग असेल.

 

* * *

सुषमा काणे/तुषार पवार/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2216618) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil