खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय खाण मंत्रालय सचिव पीयूष गोयल उद्या, 21 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केंद्रीय भूगर्भीय प्रोग्रामिंग मंडळाच्या (सीजीपीबी) 65 व्या बैठकीला संबोधित करणार


भूविज्ञानाला राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी जोडून घेत भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्था सीजीपीबीच्या 65 व्या बैठकीत आगामी वार्षिक कार्यक्रमाचे अनावरण करणार’

प्रविष्टि तिथि: 20 JAN 2026 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2026

 

केंद्रीय खनन मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्था (जीएसआय) उद्या, 21 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीत, पुसास्थित आयसीएआर संस्थेच्या ए.पी.शिंदे सिम्पोझियम सभागृहात केंद्रीय भूगर्भीय प्रोग्रामिंग मंडळाच्या (सीजीपीबी) 65 व्या बैठकीचे आयोजन करणार आहे. हा महत्वपूर्ण कार्यक्रमात केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे, उद्योग विश्व, शिक्षण क्षेत्र तसेच खनन क्षेत्रातील भागधारकांना स्वच्छ उर्जा, भौगोलिक धोके आणि शाश्वत विकास या क्षेत्रांतील नवनव्या उप्रक्रमांसह भूवैज्ञानिक घडामोडी, खनिज अन्वेषण धोरणे तसेच विविध आव्हानांवर उपाययोजना यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी एकत्र आणेल.

केंद्रीय भूगर्भीय प्रोग्रामिंग मंडळ (सीजीपीबी) हा केंद्रीय खनन मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेचा (जीएसआय) अत्यंत महत्त्वाचा मंच असून विचार विनिमय करून कार्याची द्विरुक्ती टाळण्यासाठी त्यावर जीएसआयचा वार्षिक क्षेत्र हंगाम कार्यक्रम (एफएसपी) जारी करण्यात येतो. सीजीपीबीचे सदस्य तसेच राज्य सरकारे, केंद्र आणि राज्यांच्या खनिज अन्वेषण संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच खासगी उद्योजक जीएसआयसोबत सहयोगातून कार्य करण्यासाठी या मंचावर आपापल्या विनंत्या सादर करतात. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमांनुसार तसेच सदस्य आणि भागधारकांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे महत्त्व आणि तातडीच्या आधारावर, सीजीपीबी बैठकीच्या सर्वोच्च स्तरावर होणाऱ्या चर्चा तसेच विचारविनिमयानंतर आगामी आर्थिक वर्षाच्या कालावधीत होणारे सर्वेक्षण आणि मॅपिंग, अन्वेषण, संशोधन आणि विकास, सामाजिक प्रकल्पांसाठी बहुविद्याशाखीय सेवा पुरवणे तसेच प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती कार्यक्रम यांसंदर्भातील जीएसआयच्या वार्षिक कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.

केंद्रीय खाण मंत्रालय सचिव पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या सीजीपीबीच्या या 65 व्या बैठकीला जीएसआयचे महासंचालक असित साहा, केंद्रीय खाण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय लोहिया यांच्यासह केंद्रीय खाण मंत्रालय, राज्य भूगर्भीय विभाग, सार्वजनिक उपक्रम तसेच खासगी अन्वेषण/खनन कंपन्यांचे ज्येष्ठ प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत.

सदर बैठकीत होणाऱ्या चर्चांमध्ये खनिज क्षेत्रासमोर उभ्या असलेल्या खालील समस्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे:

  • उर्जा संक्रमणविषयक राष्ट्रीय प्राधान्यक्रम तसेच आत्मनिर्भर भारत यांना अनुसरून लिथियम, आरईईज, ग्रॅफाईट, पीजीई, वॅनाडियम, स्कॅन्डीयम, सिसीयम इत्यादी महत्त्वपूर्ण खनिजांच शोध.
  • कृत्रिम बुद्धिमत्ता/ यांत्रिक अध्ययन यांच्यावर आधारित डाटा समावेशन, भूभौतिक सर्वेक्षणे, हायपरस्पेक्ट्रल दूरस्थ संवेदन, गहन खोदकाम आणि खनिज प्रणालींचा अभ्यास यांसारख्या आधुनिक अन्वेषण साधनांचा स्वीकार.
  • राष्ट्रीय स्त्रोतांचा कमाल वापर करून, द्विरुक्ती टाळण्यासाठी आणि संशोधन ते लिलावासाठी-सज्ज ब्लॉक्स या स्थित्यंतराला वेग देण्यासाठी विशेषतः महत्त्वाच्या आणि धोरणात्मक खनिजांसाठीचे स्पर्धा-पूर्व डाटा सामायीकीकरण आणि सहयोगात्मक अन्वेषण नमुने.
  • विभागणी तसेच उताराच्या स्थिरतेविषयीचे अभ्यास.आपत्तीची जोखीम कमी करण्यासाठी, विशेषतः हिमालयीन आणि ईशान्य भागातील राज्यांमध्ये असलेला धोका कमी करण्यासाठी, भूस्खलनाच्या धोक्याशी संबंधित

सदर बैठकीमध्ये, खनिज संशोधनावर अधिक भर देऊन भूविज्ञानाच्या विवध शाखांमध्ये समवयस्क सहकाऱ्यांनी काटेकोर पुनरावलोकन केलेल्या 1,068 प्रकल्पांचा समावेश असलेला जीएसआयचा एफएस2026-27 साठीचा वार्षिक कार्यक्रम देखील सादर करण्यात येईल. या कार्यक्रमात महत्त्वाची खनिजे, कार्बन सिक्वेस्ट्रेशन अभ्यास, ऑफशोअर संशोधन आणि सार्वजनिक कल्याणासाठी भूविज्ञान यांना दिलेल्या विस्तारित चालनेसह नवोन्मेष आणि शाश्वतता अधोरेखित करण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान विविध मान्यवरांच्या हस्ते जीएसआयच्या महत्वाच्या प्रकाशनांचे अनावरण करण्यात येईल तसेच जीएसआयची विविध कार्ये विशेषतः धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण खनिज संशोधनाच्या क्षेत्रातील कार्याचे दर्शन घडवणारे प्रदर्शन देखील मांडण्यात येईल.  

नवोन्मेष आणि स्त्रोतांच्या संरक्षणाची भारताची संकल्पना पुढे नेत सीजीपीबीची ही बैठक राष्ट्रीय भूवैज्ञानिक प्राधान्यक्रमांना जागतिक शाश्वतता ध्येयांशी जोडून घेईल.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2216481) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu