संरक्षण मंत्रालय
दारूगोळा निर्मितीमध्ये आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी, आणि या क्षेत्रात देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे- संरक्षण मंत्री
प्रविष्टि तिथि:
18 JAN 2026 7:04PM by PIB Mumbai
राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडमध्ये मध्यम क्षमतेच्या दारूगोळा निर्मिती सुविधा केंद्राचे उद्घाटन संपन्न, आर्मेनियासाठी मार्गदर्शित पिनाका क्षेपणास्त्राच्या पहिल्या तुकडीला दाखवला हिरवा झेंडा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दारूगोळा निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होण्याची आणि या क्षेत्रात देशाला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. 18 जानेवारी 2026 ला महाराष्ट्रातील नागपूर येथील सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडमध्ये मध्यम क्षमतेच्या दारूगोळा निर्मिती केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये दारूगोळ्याच्या कमतरतेमुळे येणाऱ्या अडचणीच्या काळाची आठवण करून दिली आणि त्यामुळे या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची गरज सरकारला जाणवल्याचे ते म्हणाले.

संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कऱण्यात आलेले हे सुविधा केंद्र 30 मिमी दारूगोळा तयार करणारा संपूर्ण स्वयंचलित प्रकल्प आहे, जो विशेषतः भारतीय लष्कर आणि भारतीय नौदल यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यांनी पिनाका क्षेपणास्र उत्पादन सुविधा केंद्रालाही भेट दिली आणि आर्मेनियासाठी निर्मिती केलेल्या पहिल्या मार्गदर्शित तुकडीला हिरवा झेंडा दाखवला.

संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यात दिलेल्या योगदानाबद्दल खाजगी क्षेत्राचे कौतुक करताना संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्र गुणवत्ताप्रधान आणि विश्वासार्ह उत्पादनांची निर्मिती करत असून त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रगती करत आहे. त्यांनी 2021मध्ये खाजगी क्षेत्र निर्मित पूर्णपणे भारतीय बनावटीचे मल्टि-मोड ग्रेनेड भारतीय लष्कराकडे सुपुर्द केल्याचा विशेष उल्लेख केला. सोलर समूह निर्मित नागअस्त्र ड्रोनचा वापर ऑपरेशन सिंदूर दरम्यान यशस्वीरित्या करण्यात आला कारण त्याने दहशतवादी लक्ष्याचा अचूक वेध घेतला आणि आपली सामरिक क्षमता सिद्ध केली. सिंह यांनी नागअस्त्राच्या अधिक विकसित प्रगत आवृत्तीचे कौतुक केले आणि भविष्यात गरज भासल्यास ही अस्त्रे देशाच्या शत्रूसाठी अधिक घातक ठरतील असे नमूद केले.

सोलर कंपनीच्या भार्गवास्त्र या ड्रोनविरोधी प्रणालीच्या यशस्वी परीक्षण प्रक्षेपणातून खाजगी क्षेत्राची तांत्रिक क्षमता ठळकपणे दिसून येत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले की, या सुविधा केंद्रात विकसित झालेल्या पिनाका क्षेपणास्त्राची निर्यात सुरू झाली असून देशाची निर्यात क्षमता आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने संरक्षण उद्योगाची क्षमता प्रदर्शित होते. भारत, आता केवळ आयातदार देश नसून निर्यातदार देश होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचेही ते म्हणाले.
***
शैलेश पाटील/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215946)
आगंतुक पटल : 10