दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दूरसंचार सहकार्यासाठी भारत आणि जर्मनीने केली संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी
आंतरराष्ट्रीय मंचांवर परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी भारत-जर्मनी करणार एकत्रित काम
प्रविष्टि तिथि:
16 JAN 2026 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2026
भारत आणि जर्मनी यांनी दूरसंचार सहकार्याबाबत संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. जर्मन फेडरल रिपब्लिकचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ हे 12–13 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले असताना या स्वाक्षऱ्या झाल्या. या संयुक्त घोषणापत्रावर केंद्र सरकारतर्फे दूरसंचार सचिव अमित अग्रवाल यांनी आणि जर्मनी सरकारतर्फे भारतातील जर्मन राजदूत डॉ. फिलिप ॲकरमन यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
भारताचे पंतप्रधान आणि जर्मनीचे फेडरल चान्सलर यांच्या चर्चेतील महत्त्वाच्या निर्णयांपैकी हे घोषणापत्र एक आहे. हा करार भारत सरकारच्या दूरसंचार विभाग (डॉट) आणि जर्मनी सरकारच्या फेडरल मंत्रालय फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड गव्हर्नमेंट मॉडर्नायझेशन (बीएमडीएस) यांच्यात झाला.
त्यामुळे नियमित सल्लामसलत आणि उच्चस्तरीय वार्षिक बैठका घेण्यासाठी चौकट तयार झाली आहे. याला खास कार्यगट आणि बहु-हितधारक सहभाग (सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्था) यांचा आधार असेल. या उपक्रमांमुळे नियोजित आणि परिणामाभिमुख सहकार्य केले जाईल.
दोन्ही बाजूंनी एकत्रित कामकाजाचा आराखडा तयार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या आराखड्यात ठराविक उद्दिष्टे आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांचा समावेश असेल. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या प्राधान्यक्रमांमध्ये सुसंगती साधता येईल. दूरसंचार आणि डिजिटल विकासाबाबत परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि समान दृष्टिकोन ठेवण्यासाठी दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर जवळून सहकार्य करण्याची तयारीही दर्शवली आहे. या संयुक्त घोषणापत्रावर स्वाक्षरी होणं हे भारत-जर्मनी दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे सर्वसमावेशक आणि शाश्वत डिजिटल परिवर्तनाचं सामायिक उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.
Follow DoT Handles for more: -
X - https://x.com/DoT_India
Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa
सुवर्णा बेडेकर/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2215431)
आगंतुक पटल : 20