खते विभाग
शेतकऱ्यांना 2024–25 मध्ये केला पुरेसा खत पुरवठा
सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे देशभर खतांची विक्रमी उपलब्धता
प्रविष्टि तिथि:
16 JAN 2026 7:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2026
केंद्र सरकारने 2024-25 या वर्षात शेतकऱ्यांच्या कृषी गरजा वेळेवर पूर्ण करण्यासाठी विक्रमी प्रमाणात खते उपलब्ध केली.
देशातील अंदाजे राष्ट्रीय गरज सुमारे 152.50 कोटी पिशव्या (722.04 लाख टन) खतांची होती. सरकारने सुमारे 176.79 कोटी पिशव्या (834.64 लाख टन) खते उपलब्ध केली. जास्त खत उपलब्ध करून सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला आणि देशभर शेतीकार्य सुरळीत सुरू ठेवले. ही कामगिरी रेल्वे प्राधिकरणे, पोर्ट प्राधिकरणे, राज्य सरकारे आणि खत कंपन्या यांच्यामधील योग्य समन्वयामुळे शक्य झाली. इंडियन रेल्वेने खताच्या गाड्यांना महत्त्व दिले, त्यामुळे माल पटकन पोहोचला. बंदरांवरही आयात केलेले खत लगेच उतरवले गेले आणि पुढे पाठवले. सरकारने साठवण आणि वितरण प्रणाली अधिक मजबूत केल्यामुळे खत शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर पोहोचले.
याशिवाय, सरकारने खत कंपन्यांसोबत नियमित पुनरावलोकन बैठका घेतल्या. मागणी आणि पुरवठ्याचे सतत निरीक्षण केले आणि पुरवठ्याशी संबंधित समस्या तातडीने सोडवल्या. या सक्रिय पावलांमुळे देशातील कोणत्याही प्रदेशाला खतांच्या कमतरतेचा सामना करावा लागला नाही.
या एकत्रित आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणजे वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विक्रमी खत उपलब्ध झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि कृषी उत्पादनात स्थिरता आली.
सरकारने खतांची उपलब्धता मागणीपेक्षा जास्त केली (2024–25):

सुवर्णा बेडेकर/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2215418)
आगंतुक पटल : 18