पंतप्रधान कार्यालय
भारतीय सैन्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी भारतीय सैन्यास केले अभिवादन
सैन्यदलातील कालनिरपेक्ष धैर्य ,निष्ठा आणि अतूट कर्तव्यनिष्ठेची भावना यांना अभिवादन करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2026 11:34AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026
भारतीय सैन्यदिनानिमित्ताने भारतीय सैन्याचे दुर्दम्य धैर्य आणि निरंतर कर्तव्यनिष्ठा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन:पूर्वक आदरांजली वाहिली आहे.
अढळ समर्पणाच्या भावनेने राष्ट्राच्या सीमांचे आव्हानात्मक परिस्थितीत संरक्षण करणाऱ्या आणि निस्वार्थी सेवेचे उच्च आदर्श अंगिकारणाऱ्या भारतीय सैन्यदलातील जवानांचा गौरव करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी सामायिक केले आहे
भारतीय सैन्याचे शौर्य आणि त्याग याबद्दल अनंतकाळापर्यंत राष्ट्राकडून कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधानांनी भारतीय सैन्यदलाला नमन केले आहे
आपल्या विविध एक्स पोस्ट्स वरील मालिकांतून पंतप्रधान नमूद करतात:
“भारतीय सैन्यदलाच्या धैर्य आणि निरंतर कर्तव्यनिष्ठेला सैन्य दिनानिमित्त आम्ही वंदन करत आहोत
आपले जवान निस्वार्थी सेवेचे प्रतिक असून दृढ कर्तव्यनिष्ठेने अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीत देखील आपल्या देशाचे संरक्षण करतात.त्यांची कर्तव्य भावना संपूर्ण देशाला आत्मविश्वास आणि कृतज्ञतेच्या भावनेला प्रेरणा देते.
कर्तव्य बजावताना जे धारातीर्थी पडले त्यांचेही आम्ही आदरपूर्वक स्मरण करत आहोत
@adgpi”
“दुर्गम भागांपासून बर्फाळ शिखरापर्यंत आमच्या सैन्याने दाखवलेले शौर्य आणि पराक्रम यांचा प्रत्येक देशवासी गौरव करत आहे.राष्ट्राच्या सीमांचे संरक्षण करण्यात मग्न असलेल्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन!”
सुभाषित -
अस्माकमिन्द्रः समृतेषु ध्वजेष्वस्माकं या इषवस्ता जयन्तु।
अस्माकं वीरा उत्तरे भवन्त्वस्माँ उ देवा अवता हवेषु॥”
अंबादास यादव /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2214816)
आगंतुक पटल : 14