नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे ऊर्जा संक्रमण 'वसुधैव कुटुंबकम्- एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य': या तत्वावर आधारित आहे - केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

प्रविष्टि तिथि: 11 JAN 2026 5:54PM by PIB Mumbai

 

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अबुधाबी इथं आज आंतरराष्ट्रीय नवीकरणीय ऊर्जा संस्थेच्या (आयआरईएनए) 16 व्या परिषदेत भारताचे राष्ट्रीय निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी न्याय्य, समान, परवडणाऱ्या आणि शाश्वत जागतिक ऊर्जा संक्रमणाबाबत भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परिषदेला संबोधित करताना, केंद्रीय मंत्र्यांनी , ऊर्जा संक्रमणासंदर्भातला भारताचा दृष्टीकोन वसुधैव कुटुंबकम्- एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या तत्वावर आधारित आणि समान, सर्वसमावेशकता आणि धोरणात्मक स्थिरतेवर आधारित दीर्घकालीन दृष्टीकोनावर आधारित असल्याचे नमूद केले. 2030पर्यंत 500 गिगावॅट बिगर-जीवाष्म इंधन स्रोतांद्वारे स्थापित ऊर्जा क्षमता आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. जागतिक ऊर्जा संक्रमणासाठी अफाट गुंतवणूक आणि सहकार्य आवश्यक असेल असेही केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. 2030 पर्यंत एकट्या भारताला सुमारे 300 अब्ज अमेरिकन डॉलरची गरज लागणे अपेक्षित आहे, त्यामुळे नवीकरणीय ऊर्जा निर्मिती, साठवणूक, हरित हायड्रोडन, ग्रीड आणि उत्पादन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय संधी निर्माण होतील. स्थिर धोरण आणि पारदर्शक बाजारपेठांसह भारत स्वच्छ ऊर्जा गुंतवणुकीसाठी सर्वांत आकर्षक स्थानांपैकी एक राहिला असल्याचे ते म्हणाले.

प्रगत आंतरराष्ट्रीय सहकार्याचे आवाहन करताना, जोशी यांनी तंत्रज्ञान हस्तांतरण, अल्प मूल्याचा वित्तपुरवठा, क्षमता बांधणी आणि निकषांचे सुसुत्रीकरण, विशेषतः विकसनशील देशांना त्यांच्या विकासाच्या अपेक्षांशी कोणतीही तडजोड न करता नवीकरणीय उर्जेच्या विस्तारीकरणासाठी पाठिंबा मिळणे महत्त्वाचे आहे यावर भर दिला.

आयआरईएनएला भारताचा भक्कम पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार करतानाच, जागतिक नवीकरणीय ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी भारत त्याचा अनुभव, संस्था आणि तांत्रिक कौशल्य सामाईक करण्यास आणि सर्व सदस्य देशांसमवेत, विशेषतः अल्पविकसित देश आणि लहान बेटांवरील विकसनशील देशांसमवेत काम करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

***

सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2213511) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam