संरक्षण मंत्रालय
हायपरसोनिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी डीआरडीओची अॅक्टिव्हली कूल्ड स्क्रॅमजेट फुल स्केल कंबस्टरची दीर्घ कालावधीची जमिनीवरील यशस्वी चाचणी
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (डीआरडीएल), हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विकासात एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. डीआरडीएलने आपल्या अॅक्टिव्हली कूल्ड स्क्रॅमजेट फुल स्केल कंबस्टरची दीर्घ कालावधीची जमिनीवरील चाचणी यशस्वीपणे घेतली. 09 जानेवारी, 2026 रोजी आपल्या अत्याधुनिक स्क्रॅमजेट कनेक्ट पाईप टेस्ट (एससीपीटी) सुविधा 12 मिनिटांपेक्षा जास्त काळ वापरली.
MUG4.JPEG)
ही महत्वाची कामगिरी 25 एप्रिल 2025 रोजी दीर्घ कालावधीसाठी केलेल्या पूर्वीच्या सबस्केल चाचणीवर आधारित आहे. हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या विकासामधील हे महत्त्वाचे पाऊल आहे. कंबस्टर आणि चाचणी सुविधा डीआरडीएलने डिझाइन आणि विकसित केल्या आहेत, तर उद्योगातील भागीदारांनी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. या यशस्वी चाचणीने प्रगत एरोस्पेस क्षमतांमध्ये भारताचे स्थान उंचावले आहे. हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र दीर्घकाळासाठी ध्वनीच्या पाचपट वेग (6,100 किमी / तासापेक्षा जास्त) गाठायला सक्षम आहे. हे उल्लेखनीय यश अत्याधुनिक एअर-ब्रीदिंग इंजिनद्वारे साध्य केले आहे, जे दीर्घकाळ उड्डाण करताना सुपरसोनिक ज्वलनाचा वापर करते. एससीपीटी सुविधेद्वारे केलेल्या जमिनीवरील चाचण्यांमधून प्रगत स्क्रॅमजेट कंबस्टरची रचना तसेच अत्याधुनिक चाचणी सुविधेची क्षमता यशस्वीरित्या प्रमाणित केली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फुल स्केल अॅक्टिव्हली कूल्ड लॉन्ग ड्युरेशन स्क्रॅमजेट इंजिनच्या जमिनीवरील यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, उद्योग क्षेत्रातील भागीदार आणि अकादमी यांची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, ही कामगिरी देशाच्या हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा भक्कम पाया आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी या प्रशंसनीय कामगिरीबद्दल चाचणीशी संबंधित चमूचे अभिनंदन केले.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213105)
आगंतुक पटल : 29