आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
नागपूरमध्ये महानगर रोगनिगराणी युनिट्सची (एमएसयू) राष्ट्रीय आढावा बैठक
राष्ट्रीय एमएसयू बैठकीत केंद्र सरकारकडून शहरी रोगनिगराणी प्रगतीचा आढावा
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2026 9:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2026
नागपूर येथे 6–7 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांची राष्ट्रीय आढावा बैठक झाली. ही बैठक देशातील 20 शहरांसाठी होती. सक्रिय रोग निगराणी, सुरक्षित शहरे हा या बैठकीचा विषय होता. या टायर-I आणि टायर-II शहरांमधील शहरी रोगनिगराणी व्यवस्था तपासणे आणि ती अधिक मजबूत करणे हे बैठकीचे उद्दिष्ट होते.

या बैठकीला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव सौरभ जैन आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे (एनसीडीसी) संचालक डॉ. रंजन दास उपस्थित होते. याशिवाय हैदराबाद आणि सिमला येथील नगर आयुक्त, नागपूर आणि पाटणा येथील अतिरिक्त आयुक्त, भोपाळ नगर निगमचे उपायुक्त, आरोग्य मंत्रालय व एनसीडीसी चे वरिष्ठ अधिकारी, महानगर रोगनिगराणी युनिट्सचे नोडल अधिकारी आणि इतर महत्त्वाचे प्रतिनिधी सहभागी झाले.

लवकर इशारा देणारी यंत्रणा मजबूत करणे, वेळेवर सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद मिळवणे आणि शहरी भागात रोग व आपत्तींसाठी सज्जता वाढवणे यावर चर्चेचा भर होता. तांत्रिक सत्रांमध्ये नागपूरच्या महानगर रोगनिगराणी युनिटने एईएस ( तीव्र मेंदूज्वर सिंड्रोम) प्रादुर्भावावरील तपास व प्रतिसाद सादर केला. इतर शहरांनी आपले अनुभव आणि चांगल्या पद्धती सामायिक केल्या. तसेच महानगर रोगनिगराणी युनिट्सच्या (एमएसयू) प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
वैज्ञानिक सत्रामध्ये एमएसयू – शहरी रोगनिगराणीमध्ये एक धोरणात्मक गुंतवणूक” या विषयावर चर्चा झाली. यात एनसीडीसी, जागतिक बँक, पाथ ( प्रोग्रॅम फॉर अॅप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी इन हेल्थ), एम्स – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर), आयसीएमआर ( भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद), डीएएचडी ( पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग), वन्यजीव विभाग, शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर, एपीएचओ( विमानतळ आरोग्य संस्था नागपूर) तसेच आयएमए (भारतीय वैद्यकीय संघटना) आणि आयएपी( भारतीय बालरोग अकादमी) सारख्या व्यावसायिक संस्थांचे तज्ज्ञ सहभागी झाले.

सहभागींना सर्व प्रकारच्या आपत्तींसाठी तयारीचे आराखड्यांबद्दल माहिती देण्यात आली आणि शहरांसाठी आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले गेले.
सुरक्षित, सक्षम आणि सार्वजनिक आरोग्य संकटांना तोंड देण्यासाठी शहरे सज्ज करण्याबरोबर शहरी भागात रोगनिगराणी आणि सार्वजनिक आरोग्य प्रतिसाद अधिक मजबूत करणे गरजेचे आहे, यावर सर्वांचे एकमत झाले.
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212265)
आगंतुक पटल : 21