विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"पायरोलिसिस मार्गे बायो-बिटुमेन : शेतातल्या टाकाऊ अवशेषांपासून ते रस्त्यापर्यंत" या यशस्वी तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारत 'स्वच्छ, हरित महामार्ग'च्या युगात प्रवेश करत आहे,सीएसआयआर-सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएसआयआर-सीआरआरआय) नवी दिल्ली आणि सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम डेहराडून (सीएसआयआर-आयआयपी) यांनी विकसित केलेले हे स्वदेशी संशोधन आहे: डॉ.जितेंद्र सिंह

प्रविष्टि तिथि: 07 JAN 2026 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2026

"सीएसआयआर-सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएसआयआर-सीआरआरआय) नवी दिल्ली आणि सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम डेहराडून (सीएसआयआर-आयआयपी) यांनी विकसित केलेले स्वदेशी अभिनव संशोधन "पायरोलिसिस मार्गे बायो-बिटुमेन : शेतातल्या टाकाऊ अवशेषांपासून ते रस्त्यापर्यंत" च्या यशस्वी तंत्रज्ञान हस्तांतरणासह भारत 'स्वच्छ, हरित महामार्ग'च्या युगात प्रवेश करत आहे आणि या दिवसाची  इतिहासात नोंद होईल" असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. "पायरोलिसिसद्वारे बायो-बिटुमेन: शेतातल्या टाकाऊ अवशेषांपासून ते रस्त्यापर्यंत" यावरील तंत्रज्ञान हस्तांतरण समारंभात ते आज बोलत होते. 

हा दिवस एक ऐतिहासिक मैलाचा दगड  म्हणून लक्षात ठेवला जाईल, असे सांगून डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, भारतातील महामार्ग आता जीवाश्म इंधनावरील  अवलंबित्वाकडून जैव-संचालित, पुनरुत्पादक आणि चक्रीय अर्थव्यवस्थेकडे वळत आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या रस्त्यांचा खर्च कमी असेल , त्यांचे आयुर्मान अधिक असेल आणि पर्यावरणीय प्रदूषणाच्या धोक्यापासून देखील मुक्त असतील.

त्यांनी या उपक्रमाचे वर्णन संपूर्ण विज्ञान, संपूर्ण सरकार आणि संपूर्ण समाजाचा प्रयत्न असे केले, जे एकत्रितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील विकसित भारताच्या निर्मितीच्या संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते.

सिंह यांनी  अधोरेखित केले की बायो-बिटुमेन सारख्या तंत्रज्ञानामुळे स्वच्छता, आत्मनिर्भर भारत आणि आर्थिक स्वयंपूर्णता  यासारख्या राष्ट्रीय मोहिमांमध्ये वैज्ञानिक संशोधन कसे थेट काम करू शकते हे दिसून येते.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी पुढे अधोरेखित केले की सीएसआयआरच्या 37 प्रयोगशाळांपैकी प्रत्येकाच्या उत्तम यशोगाथा  आहेत, परंतु गेल्या दशकात नागरिक, उद्योग आणि राज्यांसाठी विज्ञान खुले करण्यावर भर देण्यात आला  आहे. कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती दृष्टिकोनाचा संदर्भ देत त्यांनी नमूद केले की बायो-बिटुमेन एकाच वेळी अनेक आव्हानांना सामोरे जाते , ज्यामध्ये पेंढा व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणापासून ते आयात कमी करणे समाविष्ट आहे. त्यांनी  निरीक्षण नोंदवले की भारत सध्या त्याच्या बिटुमेन गरजेच्या जवळपास 50%  आयात करतो आणि बायो-बिटुमेनसारख्या नवोन्मेषामुळे  देशांतर्गत क्षमता बळकट होण्याबरोबरच परकीय अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होईल.

सीएसआयआर चमूचे  अभिनंदन करताना, मंत्र्यांनी बायो-बिटुमेन नवोन्मेष  हे जागतिक स्तरावरील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी असल्याचे नमूद  केले. दरवर्षी 25,000–30,000  कोटी रुपये किमतीची आयात केली जाणाऱ्या बिटुमेनची जागा घेण्याची यात आर्थिक क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आणि प्रदेश-निहाय , संसाधन-आधारित संशोधन करण्याचे आवाहन केले.

तंत्रज्ञान हस्तांतरण कार्यक्रमाने शाश्वत पायाभूत सुविधा, स्वदेशी नवोन्मेष आणि जैव-संचालित आर्थिक भविष्याप्रति भारताच्या वचनबद्धतेला बळकटी दिली आहे, देशाला स्वच्छ, हरित आणि आत्मनिर्भर  महामार्गांच्या मार्गावर भक्कमपणे उभे केले आहे.

 

शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2212169) आगंतुक पटल : 22
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Tamil