वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडसफूड 2026 प्रदर्शनातून भारताच्या जागतिक खाद्यान्न व्यापारातील वाढत्या नेतृत्वाचे घडणार दर्शन

प्रविष्टि तिथि: 07 JAN 2026 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जानेवारी 2026

ग्रेटर नोएडाच्या इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे इंडसफूड या प्रदर्शनाची 9वी आवृत्ती 8 ते 10 जानेवारी 2026 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. हे भारताचे प्रमुख जागतिक खाद्यान्न आणि पेय व्यापार प्रदर्शन आहे. जागतिक अन्न पुरवठा साखळ्यांमध्ये विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक भागीदार म्हणून भारताची भूमिका अधिक मजबूत करणे हा टीपीसीआय अर्थात भारत व्यापार प्रोत्साहन परिषदेतर्फे आयोजित या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

हे आशियातील प्रमुख प्रदर्शन भारतीय अन्न उत्पादक, आंतरराष्ट्रीय खरेदीदार, धोरणकर्ते, उद्योग जगतातले अग्रणी  आणि जागतिक संस्था यांना एका मंचावर आणेल. त्यामुळे व्यापार सहकार्य, द्विपक्षीय संबंध आणि दीर्घकालीन भागीदारी सुलभ होतील.

या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान करतील. यामुळे केंद्र सरकारची अन्न प्रक्रिया क्षेत्र मजबूत करण्याची, निर्यात स्पर्धात्मकता वाढवण्याची आणि भारतीय अन्न उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश वाढवण्याची वचनबद्धता दिसून येते.

इंडसफूड 2026 प्रदर्शनात भारत–संयुक्त अरब अमिराती  फूड कॉरिडॉर  उपक्रमाचे उद्घाटन अबुधाबी फूड हबद्वारे केले जाईल. लोकांना सुरक्षित अन्न मिळावे, अन्न पोहोचवण्याची व्यवस्था सोपी व्हावी आणि भारत– संयुक्त अरब अमिराती  यांच्यातील अन्न व्यापार अधिक वेगाने वाढावा, हा त्या मागील हेतू आहे.  सौदी अरेबियाचे प्रदर्शक अलसलान यांची अमृतमहोत्सवी वर्षाची वाटचाल साजरी करणे हेही या प्रदर्शनाचे एक आकर्षण आहे.  हा सांस्कृतिक आणि व्यापारी उपक्रम सौदी अरेबियाच्या दीर्घकालीन अन्न व्यापार परंपरेचे द्योतक आहे. त्यामुळे भारताशी त्यांची भागीदारी अधिक मजबूत होते.

या प्रदर्शनात 120 पेक्षा जास्त देशांचा सहभाग अपेक्षित असून हजारो प्रमाणित जागतिक खरेदीदार आणि अनेक उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रतिनिधी मंडळांचा समावेश असेल.

इंडसफूड 2026 मध्ये जागतिक व्यवसाय आणि लॉजिस्टिक्ससाठी विशेष मंच असतील. त्यामध्ये ‘भारत मार्ट सत्र (डीपी वर्ल्ड ) असेल. निर्यात पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स एकत्रीकरण आणि धोरणात्मक संवाद यावर भर दिला जाईल. त्यामुळे भारताची निर्यात स्पर्धात्मकता वाढेल.

कौशल्य विकास आणि पाककला नेतृत्व हा आणखी एक महत्त्वाचा भाग असेल. इंडियन फेडरेशन ऑफ कलिनरी असोसिएशन्स (आयएफसीए) यांच्या सहकार्याने इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर कलिनरी लीडरशिप (आयआयसीसीएल), 150 शेफसाठी पाच दिवसांचा निवासी कार्यक्रम आयोजित करेल. यात भारतीय पाककलेचा राजदूत – पहिला स्तर प्रमाणपत्र दिले जाईल.

इंडसफूड 2026 मध्ये अनेक उच्चस्तरीय जागतिक प्रतिनिधी मंडळे सहभागी होतील. सुरक्षित, शुद्ध आणि पोषणयुक्त अन्न आणि विश्वासार्ह अन्नाची जागतिक मागणी वाढत असल्याने इंडसफूड 2026 भारतीय उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.


‍निलीमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/‍प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2212163) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Tamil