सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एएसआय स्मारके आणि संग्रहालयांसाठी ऑनलाइन तिकीट आरक्षण आता ओएनडीसी नेटवर्कवर लाईव्ह

प्रविष्टि तिथि: 06 JAN 2026 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जानेवारी 2026

भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) वर 170 हून अधिक केंद्रीय  संरक्षित स्मारके आणि संग्रहालयांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरू केली आहे.

या उपक्रमामुळे एएसआय स्मारके आणि संग्रहालयांसाठी डिजिटल पोहोच  मोठ्या प्रमाणात वाढली आहे, ज्यामुळे भारत आणि परदेशातील पर्यटकांसाठी देशातील काही सर्वात प्रतिष्ठित वारसा स्थळे आणि संग्रहालयांचे प्रवेश तिकिट अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सहजपणे बुक करणे सोपे झाले आहे.

एएसआयची तिकीट प्रणाली एका ओपन  डिजिटल नेटवर्कवर एकत्रित केल्यामुळे, नागरिक आणि पर्यटक विविध ॲप्लिकेशन्सद्वारे तिकिटे बुक करू शकतात. यामुळे सुलभता आणि सुविधांमध्ये सुधारणा होते, तसेच आंतरकार्यक्षम डिजिटल प्रणालींद्वारे सार्वजनिक सेवांचे पारदर्शक आणि कार्यक्षम वितरण मजबूत होते.

ओएनडीसी-सक्षम ॲप्लिकेशन्सद्वारे एएसआय स्मारकांसाठी तिकिटे बुक  करणाऱ्या पर्यटकांना सध्याच्या सवलतींचा लाभ घेणे सुरू ठेवता येईल. यामध्ये भारतीय पर्यटकांसाठी 5 रुपयांची आणि परदेशी नागरिकांसाठी 50 रुपयांची सवलत समाविष्ट आहे.

ऑनलाइन तिकीट बुकिंगमुळे पर्यटकांना स्मारके आणि संग्रहालयांबाहेर  प्रत्यक्ष तिकिट रांगा टाळता येणार असून त्यामुळे जलद आणि सुरळीत प्रवेश सुनिश्चित होतो.

हे एकत्रीकरण एनडीएमएल (एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट लिमिटेड) द्वारे तांत्रिकदृष्ट्या शक्य झाले आहे, ज्यांनी एएसआयच्या स्मारके आणि संग्रहालयांची संपूर्ण यादी ओएनडीसी नेटवर्कवर समाविष्ट केली आहे.

तिकिटे सध्या हायवे डिलाइट (वेब, अँड्रॉइड आणि आयओएस), पेलोकलच्या व्हॉट्सॲप-आधारित तिकीट बुकिंग सेवेद्वारे (वापरकर्ते +91 84228 89057 या क्रमांकावर "Hi" पाठवून बुकिंग सुरू करू शकतात) आणि मोंडीच्या 'अभि' (अँड्रॉइड आणि आयओएस) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक अतिरिक्त ग्राहक-केंद्रित ॲप्लिकेशन्स ओएनडीसी नेटवर्कसोबत एकत्रीकरणाच्या विविध टप्प्यांवर आहेत.


सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2211945) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Punjabi , Telugu