वस्त्रोद्योग मंत्रालय
एनआयएफटी ने ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवली
प्रविष्टि तिथि:
06 JAN 2026 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जानेवारी 2026
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ने शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी फॅशन डिझाइन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्यामध्ये विविध श्रेणींसाठी शुल्कात कपात करण्यात आली आहे. या शुल्क कपातीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांना मिळावा यासाठी, एनआयएफटी ने अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 जानेवारी 2026 पर्यंत वाढवली आहे (14 ते 16 जानेवारी 2026 पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करता येईल). कॉम्प्युटर-आधारित (CBT) आणि पेन-पेपर आधारित प्रवेश परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे देशभरातील 102 शहरांमध्ये 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेतली जाणार आहे.
2026-27 च्या तुकडीसाठी, खुल्या, ओबीसी (एनसीएल) आणि खुल्या- आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 3,000 रुपयांवरून 2,000 रुपये तर अनुसूचित जाती, जमाती (एससी, एसटी) आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 1,500 रुपयांवरून कमी करून 500 रुपये करण्यात आले आहे.
इच्छुक उमेदवार अधिक माहितीसाठी https://exams.nta.nic.in/niftee/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211853)
आगंतुक पटल : 14