संरक्षण मंत्रालय
एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय 'एअरोनॉटिक्स 2047'राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
04 JAN 2026 3:41PM by PIB Mumbai
एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित 'एअरोनॉटिक्स 2047'या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टिम्स (सीएबीएस) येथे 4 जानेवारी 2026 रोजी सुरुवात झाली. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्धाटन झाले. या प्रसंगी, हवाई दल प्रमुखांनी केलेल्या भाषणात, लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस विमानाच्या उड्डाणाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एडीएचे अभिनंदन केले आणि भारतीय हवाई दलाला (आयएएफ) कार्यचालन सज्ज ठेवण्यासाठी दिलेल्या मुदतीचे पालन करण्याच्या गरजेवर भर दिला.
XOO9.JPG)
या प्रसंगी बोलताना संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही काम यांनी, 'विकसित भारत @2047' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दृष्टीने आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वदेशी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
या परिषदेमध्ये, एरोस्पेस क्षेत्रातील तज्त्र, उद्योग भागीदार, शिक्षणतज्ज्ञ, विमान वाहतूक क्षेत्रातील अग्रणी आणि वक्ते यांनी एकत्रितपणे विमान शास्त्र, आरेखनातील नाविन्य, उत्पादन आणि भविष्यातील प्रगती या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. पुढील पिढीतील अत्याधुनिक विमानांचे उत्पादन, डिजीटल उत्पादन, अत्याधुनिक लढाऊ विमानांसाठी एअरोडायनामिक्स, गती क्षमता तंत्रज्ञान, उड्डाण चाचणी तंत्रे, डिजीटल ट्विन तंत्रज्ञान, प्रमाणीकरण आव्हाने, उड्डाण नियंत्रण प्रणाली आणि एव्हियोनिक्स,लढाऊ विमानांची देखभाल आव्हाने, विमान आरेखनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच अॅक्युटर्ससाठी अचूक उत्पादन यांच्यासह आधुनिक एअरोस्पेस तंत्रज्ञानाचे विविध पैलूंचा शोध घेणे हा 'एअरोनॉटिक्स 2047' परिषदेचा उद्देश आहे.
DLH4.JPG)
या परिषदेचा एक भाग म्हणून, मोठ्या संख्याने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून मोठ्या संख्येत स्वदेशी आरेखन, विमानोड्डण प्रयोगांसाठी विकसित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शनही भरवले आहे.
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211284)
आगंतुक पटल : 33