कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभाग (डीओपीपीडब्ल्यू)च्या यशस्वी कामगिरीचा वर्ष 2025 अखेर आढावा
डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) मोहीम 4.0 राबविण्यात आली 2000 शहरे/गावे/जिल्हा मुख्यालयांमध्ये, मोहिमेत एकूण 1.54 कोटी डीएलसी तयार, त्यापैकी 90 लाखांहून अधिक डीएलसीचे निर्माण चेहऱ्याच्या ओळखीद्वारे, पेन्शनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणात एक महत्त्वाचा टप्पा
सीपीईएनजीआरएएमएस (सीपेनग्राम्स) पोर्टलवर 02.12.2025 पर्यंत केंद्र सरकारच्या 1.07 लाख पेन्शनधारकांच्या तक्रारींचे निवारण
यूपीएस स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सीसीएस (एनपीएस अंतर्गत यूपीएस अंमलबजावणी) नियम, 2025 02.09.2025 रोजी अधिसूचित
एससीडीपीएम 2.0 अंतर्गत सीपेनग्राम्स डेस्कद्वारे 06 कार्यालयीन स्मरणपत्रे (ओएम) जारी करण्यात आली
राष्ट्रीय अनुभव पुरस्कार योजना, 2025 ची अंमलबजावणी आणि राष्ट्रीय अनुभव पुरस्कार योजना, 2026 अधिसूचित
3 निवृत्तीवेतन अदालतींचे आयोजन, त्यामध्ये 1467 तक्रारींचे निवारण
सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या पहिल्याच दिवशी सीजीएचएस कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘भविष्य’ प्रणालीचे सीजीएचएसमध्ये एकात्मिकरण
41,998 निवृत्तीवेतनधारकांकडून फॉर्म 6ए च्या वापरामार्फत ‘भविष्य’ प्रणालीवर निवृत्तीवेतन अर्ज सादर
Posted On:
12 DEC 2025 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2025
निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग – डीओपीपीडब्ल्यूने 2025 मध्ये निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणासाठी तक्रार निवारण प्रक्रिया सुलभ करणे आणि निवृत्तीवेतन प्रक्रियेत डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.
तक्रार निवारणातील ठळक बाबी
1. डिजिटल जीवन प्रमाणपत्र (डीएलसी) मोहीम 4.0
- 1 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत देशातील 2000 शहरे/गावांमध्ये 75,000 शिबिरे आणि 1400 नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण 1.54 कोटी डीएलसी तयार करण्यात आली.
- 90 लाखांहून अधिक म्हणजे 60 टक्क्यांपेक्षा जास्त डीएलसी फेस ऑथेंटिकेशन अर्थात चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आली. ही संख्या डीएलसी मोहिम 3.0 च्या तुलनेत 2.5 पट वाढ दर्शविते. फिकट झालेल्या बोटांच्या ठशांमुळे अडचण येणारे वयस्क निवृत्तीवेतनधारक, दिव्यांग व्यक्ती तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील निवृत्तीवेतनधारकांसाठी हे विशेषतः उपयुक्त ठरले.
- 80 वर्षे व त्यावरील वयाच्या निवृत्तीवेतनधारकांनी 11.1 लाख डीएलसी सादर केली. स्टेट बँक ऑफ इंडियाने 22 लाख, आयपीपीबीने 4.6 लाख आणि पीएनबीने 3.12 लाख डीएलसी तयार करून दिली.

ज्येष्ठ नागरिकांसाठी डीएलसी बनवून देताना
2. पेन्शनधारकांच्या तक्रारींचे निवारण
- 92 मंत्रालये व विभागांतील 1.07 लाखांहून अधिक तक्रारींचे 02.12.2025 पर्यंत निवारण करण्यात आले, यामध्ये 25,117 कुटुंब निवृत्तीवेतनविषयक आणि 13,113 अतिवृद्ध निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचा समावेश आहे.
- तक्रार निवारणासाठी लागणारा सरासरी कालावधी 2018 मधील 36 दिवसांवरून 2025 मध्ये 28 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला.
3. सीपेनग्राम्स पोर्टलमधील सुधारणा
- मंत्रालये/विभागांचे तक्रारींवरील मासिक अहवाल व तक्रार निवारण कामगिरीनुसार त्यांची क्रमवारी लावण्यास सुरुवात झाली.
- जलद तक्रार निवारणासाठी संरक्षण मंत्रालयात तक्रारींचे स्वयंचलित पुढे प्रेषण (ऑटो फॉरवर्डिंग) सुरू करण्यात आले.
4. कुटुंब निवृत्तीवेतन व अतिवृद्ध निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष मोहीम
- जुलै 2025 मध्ये एका महिन्याच्या विशेष मोहिमेत 2,210 तक्रारींपैकी 2,052 म्हणजेच 93% तक्रारींचे यशस्वीरित्या निवारण करण्यात आले.
- या मोहिमेत अल्पवयीन किंवा पालकांवर अवलंबून कन्या लाभार्थींशी संबंधित गुंतागुंतीची प्रकरणे यशस्वीरीत्या निकाली काढण्यात आली.
5. निवृत्तीवेतन अदालत
- 13.02.2025, 04.06.2025 आणि 10.09.2025 या तीन दिवशी तीन निवृत्तीवेतन अदालती भरविण्यात आल्या. त्यापैकी दोन अदालतींच्या केंद्रस्थानी कुटुंब निवृत्तीवेतन आणि अतिवृद्ध निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारी हे विषय होते.

- 1840 तक्रारींपैकी 1467 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले.
- वर्ष 2017 पासून आतापर्यंत एकूण 14 निवृत्तवेतन अदालती भरवून त्यामध्ये 26,725 प्रलंबित तक्रारींपैकी 19,133 तक्रारींचे निवारण करून 71% पेक्षा अधिक प्रकरणे यशस्वीरित्या निकालात काढण्यात आली.

तक्रारींचे तात्काळ निवारण करताना कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह.
6. राष्ट्रीय अनुभव पुरस्कार योजना
- 8 व्या राष्ट्रीय अनुभव पुरस्कार योजना 2025 अंतर्गत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या 15 उत्कृष्ट लेखनकृतींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये महिलांचा सहभाग 33% असून हा आजवरचा सर्वाधिक टक्का आहे.

राष्ट्रीय अनुभव पुरस्कार विजेते
7. अनुभव पुरस्कार विजेत्यांची वेबिनार मालिका
- अनुभव पुरस्कार विजेते आणि विशेष दखलपात्र निवृत्त व्यक्तिमत्त्वे मासिक वेबिनार मालिकेचा 22 वा भाग पूर्ण झाला.
- 16 मंत्रालयांतील वक्त्यांनी सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना आपले अनुभव मांडण्यास प्रेरित केले.

अनुभव पुरस्कार विजेत्यांची मासिक वेबिनार मालिका
8. पेन्शनविषयक न्यायालयीन प्रकरणांवर राष्ट्रीय कार्यशाळा
- पेन्शनविषयक न्यायालयीन प्रकरणांवर पहिली राष्ट्रीय कार्यशाळा 2 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली स्थित विज्ञान भवनात राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेस देशातील विविध न्यायालयांमध्ये निवृत्तीवेतनविषयक न्यायालयीन प्रकरणे हाताळणाऱ्या सर्व मंत्रालये/विभागांतील 300 हून अधिक नोडल अधिकारी व वकील उपस्थित होते.
- कार्यशाळेचा भर निवृत्तीवेतनविषयक न्यायालयीन प्रकरणांचे व्यवस्थापन सुधारणे आणि सर्व मंत्रालये/विभागांतील नोडल अधिकारी व वकील, तसेच विधी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविण्यावर होता. भारत सरकारकडून न्यायालयीन प्रकरणांचे कार्यक्षम आणि परिणामकारक व्यवस्थापनाबाबत विधी विभागाने 04.04.2025 रोजी जारी केलेल्या निर्देशांना धरून ही कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेस राज्यमंत्री, भारताचे मान्यवर महाधिवक्ता, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल, डीओपीपीडब्ल्यूचे सचिव, विधी सचिव, माजी सैनिक कल्याण सचिव, कॅट सदस्य यांनी संबोधित केले.

निवृत्तीवेतनविषयक न्यायालयीन प्रकरणांवर राष्ट्रीय कार्यशाळा
निवृत्तीवेतनाच्या प्रक्रियेचे एकात्मिकरण
1. निवृत्तीवेतन अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटायझेशन
- जुन्या नऊ अर्जांच्या ऐवजी ‘भविष्य’अंतर्गत एकच सुलभ फॉर्म 6-ए च्या वापरास सुरुवात.
- 41,998 हून अधिक सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्यांनी फॉर्म 6-ए वापरून निवृत्तीवेतन अर्ज सादर केले.
- पीएफएमएससह ‘भविष्य’ प्रणालीच्या एकात्मिकरणातून निवृत्तीवेतन अर्ज प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटायझेशन साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
2. बँकांशी एकात्मिकरण
- 2025 मध्ये एचडीएफसी, इंडियन बँक आणि आयसीआयसीआय बँक या नवीन बँकांसह ‘भविष्य’ प्रणालीचे एकात्मिकरण झाले. आतापर्यंत एकूण 9 बँकांचे एकात्मिकरण पूर्ण झाले असून त्यातून 90% निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक या प्रणालीशी जोडले गेले आहेत.

जनजागृती व संपर्क उपक्रम
1. बँक कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम
- निवृत्तीवेतन नियम व प्रक्रियांबाबत बँक कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा.
- अहमदाबादमध्ये तसेच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून निवृत्तीवेतनाचे वाटप करणाऱ्या बँकांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
2. सेवानिवृत्तीपूर्व समुपदेशन (पीआरसी) कार्यशाळा
- गुवाहाटी आणि दिल्लीमध्ये आयोजित कार्यशाळांचा लाभ सेवानिवृत्त होत असलेल्या 1,510 कर्मचाऱ्यांना मिळाला. या कार्यशाळांमध्ये सेवानिवृत्तीचे फायदे, डीएलसी देणे आणि गुंतवणुकीचे पर्याय या विषयांचा समावेश होता.
सेवानिवृत्तीपूर्व कार्यशाळा
3. निवृत्तिवेतनधारकांच्या कल्याणकारी संघटनांशी बैठका
- डीओपीपीडब्ल्यूच्या उपक्रमांविषयी जनजागृती वाढविण्यासाठी चेन्नई, गुवाहाटी, जयपूर, हैदराबाद आणि अहमदाबाद या शहरांमध्ये पाच बैठकांचे आयोजन करण्यात आले.
अहमदाबाद येथे निवृत्तिवेतनधारक जनजागृती कार्यक्रम
ग्रॅच्युइटी, एनपीएस ओएसएस आणि यूपीएसमध्ये सुधारणा
1. नियमांमध्ये दुरुस्ती/सुलभीकरण
- सीसीएस (एनपीएसअंतर्गत ग्रॅच्युइटी भरणा) नियम, 2021 मध्ये दिनांक 28.04.2025 च्या अधिसूचनेद्वारे दुरुस्ती करून त्यांना सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम, 2021 मधील तरतुदींशी मिळतेजुळते करण्यात आले.
- सीसीएस (एनपीएसअंतर्गत ग्रॅच्युइटी भरणा) नियम, 2021 वरील नियमपुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
2. एकीकृत निवृत्तिवेतन योजना (यूपीएस)
- यूपीएसचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सीसीएस (एनपीएसअंतर्गत यूपीएस अंमलबजावणी) नियम, 2025 02.09.2025 रोजी अधिसूचित करण्यात आले.
- यूपीएसमध्ये समाविष्ट कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 18.06.2025 रोजी दोन परिपत्रके जारी करण्यात आली -
- सीसीएस (एनपीएसअंतर्गत ग्रॅच्युइटी भरणा) नियम, 2021 नुसार यूपीएसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती ग्रॅच्युइटी व मृत्यू ग्रॅच्युइटीचा लाभ देण्यासाठी; आणि
- सेवाकाळात शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व/अवैध ठरविण्यामुळे सेवामुक्ती झाल्यास, यूपीएसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम, 2021 किंवा सीसीएस (असाधारण निवृत्तिवेतन) नियम, 2023 अंतर्गत ओपीएसचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी.
यूपीएस नियम, पुस्तिका
3. एनपीएस अंमलबजावणीवर देखरेख व यूपीएस संपर्क कार्यक्रम
- यूपीएसच्या अंमलबजावणीसाठी संबंधित मंत्रालये/विभाग व संस्थांसोबत सप्टेंबर 2025 मध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दररोज आढावा बैठका घेण्यात आल्या. यूपीएसचा प्रसार आणि लाभार्थ्यांपर्यंत यूपीएसच्या तरतुदी पोहोचविण्याचा हेतू या बैठकांच्या आयोजनामागे होता.
- जुलै व ऑगस्ट 2025 मध्येसीएसओआय इथे एनपीएस आणि यूपीएस विषयक प्रकरणांची हाताळणी करणाऱ्या केंद्र सरकारी अधिकाऱ्यांसाठी दोन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या. तसेच या विभागातील अधिकारी यूपीएस सुरू करण्यासंबंधी इतर विविध विभागांनी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्येही सहभागी झाले.
प्रशासन व तक्रार निवारण यंत्रणा:
1. आंतर-मंत्रालयीन आढावा बैठका (आयएमआरएम्स)
- मासिक आढाव्यांद्वारे तक्रार निवारण मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यात आले तसेच तक्रारींचा अकाली किंवा संक्षिप्त निपटारा टाळण्यात आला.
2. सीपेनग्राम्स संपर्क मोहिमा
- निवृत्तिवेतनधारकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी 1296 हून अधिक यशोगाथा व 70 लाख एसएमएस पाठविण्यात आले.
3. अनुभव संपर्क मोहिमा
- राष्ट्रीय अनुभव पुरस्कार योजना 2025 अंतर्गत मूल्यांकनासाठी 02.12.2025 पर्यंत 900 हून अधिक (मागील वर्षाच्या तुलनेत तिप्पट) लेख प्रकाशित करण्यात आले.
इतर महत्त्वपूर्ण उपक्रम
1. निवृत्तिवेतनविषयक सूचनांचे संकलन
- डीओपीपीडब्ल्यूने जारी केलेल्या सूचना/परिपत्रकांवर आधारित दोन संकलन पुस्तिका 2025 या वर्षात प्रसिद्ध करण्यात आल्या.
2. लिंगभाव समानतेविषयी कार्यशाळा
- लैंगिक छळ प्रतिबंध अधिनियम (पॉश) बाबत जनजागृतीसाठी 2025 मध्ये चार कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यापैकी अलीकडेच झालेली कार्यशाळा 17.10.2025 रोजी डीओपीपीडब्ल्यू इथे झाली.
3. राजभाषा हिंदीचा प्रसार
तृतीय राजभाषा कीर्ती पुरस्कार 2025
गृह मंत्रालय, भारत सरकारच्या राजभाषा विभागातर्फे हिंदी दिवस 14 सप्टेंबर 2025 रोजी अहमदाबाद इथे आयोजित कार्यक्रमात, 300 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या मंत्रालय/विभाग या वर्गात डीओपीपीडब्ल्यूला राजभाषा कीर्ती पुरस्कार 2024–25 (तृतीय) प्रदान करण्यात आला. केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते पुरस्काराचे सन्मानचिन्ह निवृत्तिवेतन व निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीने संयुक्त सचिव (निवृत्तीवेतन) ध्रुवज्योती सेनगुप्ता यांनी स्वीकारले.
निवृत्ती – (हिंदीच्या प्रसारासाठी एक उपक्रम)
डीओपीपीडब्ल्यूतर्फे “निवृत्ती” नावाचे हिंदी संगीतनाट्य 7 जून 2025 रोजी राष्ट्रीय नाट्य विद्यालय, मंडी हाऊस, नवी दिल्ली इथे सम्मुख प्रेक्षागृहात सादर करण्यात आले. विभागांतर्गत निर्माण केलेल्या या नाट्यात अभिनय, नृत्य, गायन व पठण डीओपीपीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांनी केले. या नाट्याचे दिग्दर्शन डीओपीपीडब्ल्यूच्या संयुक्त सचिवांनी केले. हे नाट्य अत्यंत यशस्वी ठरले आणि त्याचा आणखी एक प्रयोग 11 सप्टेंबर 2025 रोजी अभिमंच प्रेक्षागृह, एनएसडी, मंडी हाऊस, नवी दिल्ली इथे करण्यात आला.
सोपान 2025 – (हिंदीच्या प्रसारासाठी एक उपक्रम)
डीओपीपीडब्ल्यूने “सोपान 2025” नावाचे पुस्तक प्रकाशित केले असून त्यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांनी रचलेल्या कवितांचा समावेश आहे. तसेच डीओपीपीडब्ल्यूने प्रथमच निवृत्तिवेतनधारकांसाठी अखिल भारतीय स्तरावर कविता स्पर्धेचे आयोजन केले. निवृत्तिवेतनधारकांच्या निवडक कविताही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
* * *
जयदेवी पुजारी-स्वामी /शैलेश पाटील/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
(Release ID: 2210514)
अभ्यागत कक्ष : 21