श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी/ राष्ट्रीय विधी विद्यापीठ, गांधीनगर येथे ईपीएफओच्या अंमलबजावणी/लेखा अधिकाऱ्यांच्या सहाव्या तुकडीसाठी आयोजित चार आठवड्यांच्या इंडक्शन/अभिमुखता प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ संपन्न

प्रविष्टि तिथि: 28 DEC 2025 12:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025

 

प्रादेशिक पीएफ आयुक्त रिझवान उद्दीन आणि पीडीयूएनएएसएसचे मुख्य शिक्षण अधिकारी (सीएलओ) यांनी गांधीनगर येथील एनआयडीच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांशी आणि गांधीनगर येथील जीएनएलयूमध्ये ईपीएफओच्या अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

26  डिसेंबर रोजी, एनआयडी, गांधीनगरने पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 'ध्येय निश्चितीद्वारे प्रेरणा' या विषयावर एक विशेष सत्राचे आयोजन केले होते. हे सत्र अत्यंत संवादात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण होते. यात वक्त्याने विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले. यश, अपयश, आव्हानात्मक ध्येये आणि ती साध्य करण्याचा कृती आराखडा यांसारखे संबंधित प्रश्न हे भाषणातील काही मनोरंजक पैलू होते. शिस्त, इच्छाशक्ती, दृष्टिकोन, विश्वास, समन्वय आणि सातत्य यांच्या भूमिकेवर भर यावेळी देण्यात आला.

IMG_5656.JPG

एनआयडीचे प्रमुख अधिकारी डॉ. भाविन कोठारी यांनी या चर्चेचे आयोजन केले, तर आरपीएफसी-१ आणि सीएलओ, पीडीयूएनएएसएसचे रिझवान उद्दीन यांनी प्रतिष्ठित एनआयडीच्या विद्वानांनी ज्या प्रकारे चर्चेत सहभाग घेतला आणि स्वतःच्या उद्दिष्टांवर कृती करून सत्राचे उद्दिष्ट पुढे नेण्यात रस दाखवला, त्याबद्दल आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी सकाळी, गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (जीएनएल्यू), गांधीनगरने पंडित दीनदयाल उपाध्याय नॅशनल अकॅडमी ऑफ सोशल सिक्युरिटी (पीडीयूएनएएसएस), जी की ईपीएफओची राष्ट्रीय अकादमी आहे, यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकाऱ्यांच्या सहाव्या तुकडीसाठी चार आठवड्यांच्या 'प्रेरण प्रशिक्षण कार्यक्रमा'चे आयोजन केले.

WhatsApp Image 2025-12-28 at 10.28.56 AM (1).jpeg

प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ 26  डिसेंबर 2025  रोजी आयोजिण्यात आला आणि यात रिझवान उद्दीन, आरपीएफसी I आणि मुख्य शिक्षण अधिकारी, पीडीयूएनएएसएस, आणि डॉ. नितीन मलिक, कुलसचिव, जीएनएल्यू उपस्थित होते.

1 डिसेंबर 2025 रोजी प्रेरण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला, ज्यात 62  अंमलबजावणी/लेखा अधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात कायद्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या आणि संबंधित विषयांवर एकूण 81  सत्रे झाली, ज्यामध्ये अधिकाऱ्यांना 121.5 तासांचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रेरण प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान एकूण सव्वीस संसाधन व्यक्तींनी (ईपीएफओच्या अनुभवी अधिकाऱ्यांसह) सत्रांचे आयोजन केले. फौजदारी कायदा, दिवाणी कायदा, पुरावा कायदा, घटनात्मक तरतुदी, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे, अर्ध-न्यायिक प्राधिकरणांचे महत्त्व आणि संबंधित तरतुदी, पॉश कायदा, सायबर कायदे, खरेदी व्यवस्थापन, राजभाषा, करार कायदा, अर्थ लावण्याचे नियम, कामगार कायदे, नवीन कामगार संहिता आणि व्यावसायिक शिष्टाचार व व्यक्तिमत्त्व विकास यासह विविध महत्त्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला होता.

WhatsApp Image 2025-12-28 at 10.28.56 AM.jpeg

प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी, रिझवान उद्दीन, आरपीएफसी-I यांनी दोन सत्रांमध्ये प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. या मध्ये "एचएसडब्ल्यूसीएल विरुद्ध आरपीएफसी" (कलकत्ता उच्च न्यायालय) आणि "एफसीआय विरुद्ध आरपीएफसी" (दिल्ली उच्च न्यायालय) या दोन महत्त्वपूर्ण निकालांच्या माध्यमातून "कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रति" प्रमुख नियोक्त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करण्यात आल्या. नितीन मलिक, कुलसचिव, जीएनएलयू यांनी अभ्यासक्रम समन्वयक हार्दिक पारिख यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेतली आणि प्रशिक्षणार्थींच्या शिस्तीचे कौतुक केले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी मोकळ्या आणि अनौपचारिक वातावरणात आपला अभिप्राय व्यक्त केला. हार्दिक पारिख यांनी सव्वीस दिवसांच्या प्रशिक्षणाचा सविस्तर अहवाल सादर केला.

WhatsApp Image 2025-12-28 at 10.28.57 AM.jpeg

समारोप सत्रांदरम्यान, अधिकाऱ्यांना त्यांना दिलेल्या ज्ञानाचा सर्वोत्तम वापर करून राष्ट्रहितासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. रिझवान उद्दीन, आरपीएफसी-१ आणि सीएलओ, पीडीयूएनएएसएस यांनी ग्राहक-केंद्रित सेवा वितरण आणि सखोल शिक्षणाच्या गरजेवर भर दिला. ईपीएफओमध्ये काम करताना प्रशिक्षणार्थींनी त्यांच्या भूमिकेत निर्णायक, सेवाभावी, प्रतिसाद देणारे आणि सहकार्यशील असावे यासाठी त्यांना संवेदनशीलतेची जाणीव करून देण्यात आली. सरकारी सेवांमध्ये कायद्याच्या महत्त्वाविषयी त्यांना अधिक संवेदनशील करण्यात आले आणि न्यायाच्या हितासाठी भागधारकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याच्या दिशेने काम करण्यास त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

 

* * *

हर्षल आकुडे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2209162) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati