उपराष्ट्रपती कार्यालय
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सुशासन दिन समारंभात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2025 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात आयोजित सुशासन दिन समारंभाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात, उपराष्ट्रपतींनी वाजपेयी यांनी दूरदर्शी, कवी आणि जनतेचे समर्पित सेवक म्हणून दिलेले योगदान विशद केले. वाजपेयी यांचे अतुलनीय वक्तृत्व कौशल्य, विनम्रता आणि लोकशाहीप्रती बांधिलकी या गुणांनी देशाला देशांतर्गत तसेच परदेशातील जटिल आव्हानांचा सामना करण्याचा मार्ग दाखवला, सुशासनाने मजबूत आणि समृद्ध भारताचा पाया रचला. वाजपेयी यांचे शासनविषयक तत्वज्ञान पारदर्शकता, जबाबदारी, समावेशकता आणि समाजातील सर्व घटकांच्या सेवा यावर आधारलेले असल्याचे दिसून येते.
सुशासन ही एक सामायिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करताना उपराष्ट्रपती म्हणाले, पारदर्शक, नैतिक आणि जबाबदार प्रशासन सुनिश्चित करण्यात सरकारे, प्रशासक, संस्था, नागरी समाज आणि नागरिक या सर्वांची भूमिका आहे. विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनानुसार विकसित, समावेशक आणि बलशाली भारत निर्माण करण्यासाठी या तत्त्वांचे अनुसरण करावे असे आवाहन त्यांनी सहभागींना केले.
* * *
निलिमा चितळे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208631)
आगंतुक पटल : 18