पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केली उत्तर प्रदेशातील लखनौ येथील 'राष्ट्र प्रेरणा स्थळा'च्या उद्घाटनाची झलक
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2025 9:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवन आणि आदर्शांचा सन्मान करण्यासाठी उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथल्या 'राष्ट्र प्रेरणा स्थळा' च्या उद्घाटनाची झलक सामायिक केली. वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आज लखनौची भूमी एका नवीन प्रेरणेची साक्षीदार बनत आहे. त्यांनी देशवासियांना आणि जगाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या.
25 डिसेंबर हा दिवस देशातील दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या जयंतीचा ऐतिहासिक दिवस आहे, हे अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जी आणि भारतरत्न महामना मदन मोहन मालवीय जी यांनी भारताची ओळख, एकता आणि अभिमान जपण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. या दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपल्या अनमोल योगदानातून राष्ट्र उभारणीवर अमीट ठसा उमटवला आहे, असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.
'X' वरील पोस्टच्या मालिकेत मोदी म्हणाले:
"राष्ट्र प्रेरणा स्थळ इथल्या कमळाच्या फुलाच्या आकाराचे अत्याधुनिक संग्रहालय निःस्वार्थ नेतृत्व आणि सुशासनाच्या भावनेला जिवंत स्वरूपात समोर आणते. हे येणाऱ्या पिढ्यांना आपल्या जननायकांच्या आदर्शांना आत्मसात करून जीवनात अंमलात आणण्यासाठी प्रेरणा देत राहील."
"देशाच्या महान विभूतींचे आदर्श, मूल्ये आणि राष्ट्रसेवेची भावना आजही जनतेला मार्गदर्शन करत आहे. लखनौच्या माझ्या कुटुंबातील सदस्यांचा उत्साह आणि उल्हास यातून हेच सिद्ध होते."
"राष्ट्र प्रेरणा स्थळ हे त्या विचाराचे प्रतीक आहे, ज्याने भारताला स्वाभिमान, एकता आणि सेवेचा मार्ग दाखवला आहे. येथील डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांचे पुतळे आपल्याला, आपले प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक प्रयत्न राष्ट्र-उभारणीसाठी समर्पित असावा असा संदेश देतात."
"डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींनी भारतात आर्थिक आत्मनिर्भरतेची पायाभरणी केली होती. त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण आर्थिक आत्मनिर्भरतेला आणखी सशक्त बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत."
"रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक सुविधा पोहोचली पाहिजे असे पंडित दीनदयाळ यांचे स्वप्न होते. आज जेव्हा आम्ही प्रत्येक गरजवंतापर्यंत सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचवत आहोत, तेव्हा त्यांचे अंत्योदयाचे हे स्वप्न साकार होत आहे."
"अटलजींची जयंती हा सुशासनाचा उत्सव साजरा करण्याचाही दिवस आहे. भाजप-एनडीए सरकारने सुशासनाची जी परंपरा निर्माण केली आहे, तिचा आज आम्ही नव्या रुपात विस्तार करत आहोत."
"काँग्रेस आणि तिच्या मित्रपक्षांनी राजकीयदृष्ट्या भाजपाला नेहेमीच अस्पृश्य मानले आहे. परंतु भाजपाच्या संस्कारांनी आम्हाला सगळ्यांचा आदर करण्यास शिकवले आहे, याचे एक नाही, अनेक उदाहरणे आहेत…"
"राष्ट्र प्रेरणा स्थळ आपल्या देशातील की महान प्रभृतींचे जीवन, त्यांचे आदर्श आणि अजोड वारशाला समर्पित असे प्रेरणादायी स्मारक आहे. आज सुशासन दिनी लखनौमध्ये याचे लोकार्पण करताना मला अत्यंत अभिमान आणि आत्मिक समाधानाची भावना प्रत्ययास आली"
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208628)
आगंतुक पटल : 48
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam