संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाकडून पहिल्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचा ताफ्यात समावेश - यार्ड 1269 समुद्र प्रताप - गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे निर्मित
Posted On:
24 DEC 2025 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025
गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) च्या 02 पीसीवी प्रकल्पांतर्गत, भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) आपल्या ताफ्यात 23 डिसेंबर 2025 रोजी पहिले इन-बिल्ट प्रदूषण नियंत्रण जहाज (पीसीवी), समुद्र प्रताप (यार्ड 1267) समाविष्ट केले. 60% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह, या जहाजाच्या समावेशामुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांच्या दृष्टिकोनाला बळकटी मिळते.
‘समुद्र प्रताप' हे भारतीय तटरक्षक दलाचे पहिले स्वदेशी निर्मितीचे प्रदूषण नियंत्रण जहाज आहे. हे आयसीजी ताफ्यातील सर्वात मोठे जहाज आहे, जे तटरक्षक दलाच्या कार्यक्षमतेत आणि क्षमतेत लक्षणीय वाढ करते. 114.5 मीटर लांबी आणि 16.5 मीटर रुंदीचे, 4.170 टन वजनाचे हे जहाज अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. यात 30 मिमी सीआरएन-91 तोफा, एकात्मिक अग्नि नियंत्रण प्रणालीसह दोन 12.7 मिमी स्थिर रिमोट-नियंत्रित तोफा, स्वदेशी विकसित एकात्मिक पूल प्रणाली, एकात्मिक/फलाट प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली, स्वयंचलित ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली आणि उच्च-क्षमतेची बाह्य अग्निशमन प्रणाली यांचा समावेश आहे.
पीसी व्हेसल हे भारतीय तटरक्षक दलाचे पहिले जहाज आहे जे डायनॅमिक पोझिशनिंग क्षमता (डीपी-1) ने सुसज्ज आहे, ज्यामध्ये एफआयएफआय-2 / एफएफव्ही-2 नोटेशन प्रमाणपत्र आहे. ते ऑइल फिंगर प्रिंटिंग मशीन, गायरो स्टेबिलाइज्ड स्टँडऑफ अॅक्टिव्ह केमिकल डिटेक्टर आणि पीसी लॅब उपकरणे यासारख्या तेल गळती शोधण्यासाठी प्रगत प्रणालींनी सुसज्ज आहे जे विशेष आर्थिक क्षेत्र आणि त्यापलीकडे व्यापक प्रदूषण प्रतिसाद ऑपरेशन्स सक्षम करतात. हे उच्च अचूक ऑपरेशन्स करण्यास, चिकट तेलातून प्रदूषक पुनर्प्राप्त करण्यास, दूषित पदार्थांचे विश्लेषण करण्यास आणि दूषित पाण्यापासून तेल वेगळे करण्यास सक्षम आहे. या समारंभाला आयसीजीचे पीडी (एमएटी) डीआयजी व्ही के परमार; जीएसएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रजेश कुमार उपाध्याय आणि आयसीजी आणि जीएसएलचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* * *
शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2208263)
अभ्यागत कक्ष : 76