कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह 25 डिसेंबर 2025 रोजी सुशासन पद्धतींवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे करणार उद्घाटन
राज्यमंत्री कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे 7 अहवाल आणि ऍप्स देखील प्रकाशित करणार आहेत, ज्यामध्ये मंत्रालयाच्या विविध सर्वोत्तम पद्धती आणि उपक्रमांचा समावेश आहे
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2025 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025
डॉ. जितेंद्र सिंह, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री 25 डिसेंबर 2025 रोजी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त चाणक्यपुरी, नवी दिल्ली येथील नागरी सेवा अधिकारी संस्थेत आयोजित करण्यात येणाऱ्या सुशासन पद्धतींवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करणार आहेत. सुशासन पद्धतींवरील ही पाचवी राष्ट्रीय कार्यशाळा आहे. दरवर्षी 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत साजरा होणाऱ्या सुशासन सप्ताहाचा हा एक अविभाज्य भाग बनला आहे.
पंतप्रधानांनी 09.12.2025 रोजीच्या त्यांच्या संदेशात सुशासन सप्ताहात प्रशासन गाव की ओर मोहिम यशस्वी होवो अशा शुभेच्छा दिल्या आणि नमूद केले की, "सरकार-संचालित कार्यक्रम म्हणून सुरू झालेला हा कार्यक्रम आज सुशासनासाठी लोकचळवळीत रूपांतरित झाला आहे, ज्यामुळे नागरिक आणि संस्था सुधारित सेवा पुरवठ्याद्वारे जवळ आल्या आहेत."
या दृष्टिकोनाची अंमलबजावणी करण्यासाठी, जिल्हा आणि तहसील स्तरावर सर्व 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये सेवा वितरण सुधारण्यासाठी अर्जांचा निपटारा, CPGRAMS आणि राज्य पोर्टलवर सार्वजनिक तक्रारींचे निवारण, विशेष शिबिरांचे आयोजन, सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्याबाबत यशोगाथा सामायिक करणे आणि समर्पित पोर्टलवर सर्वोत्तम प्रशासन पद्धती अद्यतनित करणे यांचा समावेश होता. आतापर्यंत, या 1 आठवड्याच्या या कार्यक्रमांतर्गत,1.50 कोटींहून अधिक सेवा वितरण अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे आणि 32 हजारांहून अधिक शिबिरे आणि कार्यशाळांद्वारे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 17 लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे.

आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप , CSOI येथे आयोजित कार्यशाळेने होणार आहे. यात (i) निर्णय प्रक्रियेत कार्यक्षमता वाढवण्यासाठी पुढाकार आणि (ii) स्वच्छता संस्थात्मक करण्यासाठी आणि सरकारमधील प्रलंबित कामे कमी करण्यासाठी विशेष मोहीम 5.0 चे निष्कर्ष यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. ही विशेष मोहीम 2021 पासून दरवर्षी 2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान राबवली जाते. एकत्रितपणे (2021-2025), विशेष मोहिमा आणि मासिक सचिवालय सुधारणांमध्ये 23.65 लाख मोहीम स्थळांचा समावेश होता , 167.38 लाख फाईल्स काढून टाकण्यात आल्या/बंद करण्यात आल्या, 930.2 लाख चौरस फूट जागा विधायक वापरासाठी मोकळी करण्यात आली आणि 4,130.63 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला.
कार्यशाळेत, डॉ. जितेंद्र सिंह कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयातील सर्वोत्तम पद्धतींचा समावेश असलेले अहवाल प्रकाशित करतील ज्यात विशेष मोहीम 5.0 चा मूल्यांकन अहवाल, CPGRAMS चा वार्षिक अहवाल आणि माजी सैनिकांसाठी आरक्षणावरील संकलन (ESM) यांचा समावेश आहे. मंत्रालयाने हाती घेतलेल्या काही नवीन आयटी उपक्रमांचा देखील ते प्रारंभ करतील ज्यात एआय पॉवर्ड रिक्रूटमेंट रूल्स जनरेटर टूल, eHRMS 2.0 साठी मोबाइल अॅप, iGOT कर्मयोगी पोर्टलवरील नवीन वैशिष्ट्ये आणि कर्मयोगी डिजिटल लर्निंग लॅब 2.0 यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारमधील सुशासन पद्धतींवरील राष्ट्रीय कार्यशाळेत विशेष मोहिमेच्या सर्वोत्तम पद्धती आणि निर्णय प्रक्रियेत कार्यक्षमता वाढविण्याच्या उपक्रमावर चर्चा आणि त्यांचा प्रसार यांचा समावेश असेल. राज्य/केंद्रशासित प्रदेशातील 1000 हून अधिक अधिकारी देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होतील.
कचऱ्यापासून संपत्ती

"बोधी वृक्ष" कचऱ्यापासून कला , वाराणसी, रेल्वे मंत्रालय

भारतातील चारधाम मंदिरांच्या कलात्मक प्रतिकृतींमध्ये रूपांतरित केलेले भंगार साहित्य; कोळसा मंत्रालय

* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208259)
आगंतुक पटल : 37