वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय व्यावसायिक सेवांसाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करारांतर्गत व्यावसायिक सेवांवर कायदेशीररीत्या बंधनकारक कटिबद्धता आवश्यक: केंद्रीय वाणिज्य सचिव

प्रविष्टि तिथि: 24 DEC 2025 9:52AM by PIB Mumbai

व्यावसायिक सेवांवर आधारित चिंतन शिबिराचे उद्घाटन करताना, केंद्रीय वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी भागधारकांमधील वाढीव समन्वयाचे महत्त्व, देशांतर्गत परिसंस्थेतील सुधारणा तसेच भारतीय व्यावसायिक सेवांसाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडून देण्याच्या उद्देशाने मुक्त व्यापार करारांतर्गत व्यावसायिक सेवांवर कायदेशीररीत्या बंधनकारक कटिबद्धता यांवर अधिक भर दिला.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालय (डीओसी) तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय यांनी भारतीय सनदी लेखापाल संस्था (आयसीएआय) आणि सेवा निर्यात प्रोत्साहन मंडळ (एसईपीसी) यांच्या सहकार्याने काल 23 डिसेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील वाणिज्य भवन येथे आयोजित केलेल्या “जागतिक क्षितिजांचा विस्तार: भारतीय व्यावसायिकांसाठी संधी” या संकल्पनेवर आधारित चिंतन शिबिरात ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान बोलताना, जागतिक मूल्यवर्धन तसेच व्यापारी निर्यातीत सेवा व्यापाराचे सशक्त योगदान लक्षात घेत वाणिज्य सचिवांनी भारताच्या आर्थिक विकासातील सेवा व्यापाराचे महत्त्व अधोरेखित केले.

भारताचा लोकसंख्याविषयक लाभांशामध्ये व्यावसायिक सेवांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्याची अमर्याद क्षमता आहे यावर वाणिज्य सचिव अग्रवाल यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की, या क्षमतेचा उपयोग करून घेण्यासाठी जगातील सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करणे तसेच नव्याने उदयाला येत असलेल्या जागतिक बाजारपेठांच्या गरजा आणि तंत्रज्ञानविषयक घडामोडी यांच्याशी जुळणाऱ्या अद्ययावत कौशल्यांच्या ज्ञानासह व्यावसायिकांना सुसज्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्रीय वाणिज्य सचिव म्हणाले की, व्यावसायिक सेवांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय व्यापारात अधिक खुलेपणा आणल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता आणखी सुधारेल. ज्ञानाचे सामायिकीकरण शक्य करण्यासाठी आणि वाढीव सहकार्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन करण्यासाठी तसेच अशा विविध परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी व्यावसायिक संस्थांना प्रोत्साहित केले.

केंद्रीय वाणिज्य विभागाचे संयुक्त सचिव दर्पण जैन यांनी चितन शिबिराचा संदर्भ विषद केला. आयसीएआयचे अध्यक्ष सीए चरणज्योत सिंह नंदा; भारतीय नर्सिंग मंडळाचे (आयएनसी)अध्यक्ष डॉ.टी.दिलीप कुमार तसेच वास्तूविशारद मंडळाचे (सीओए) अध्यक्ष प्रा.अभय विनायक पुरोहित यांनी विविध घटकांसंदर्भातील दृष्टीकोन मांडले. आयसीएआयचे उपाध्यक्ष सीए प्रसन्न कुमार डी आणि एसईपीसीच्या प्रमुख डॉ.उपासना अरोरा यांनी देखील उद्घाटनपर सत्रात सहभागींना संबोधित केले.

(अ) जागतिकदृष्ट्या सज्ज व्यावसायिकांची घडण;(ब)परस्पर मान्यता करार (एमआरएज) तसेच सामंजस्य करारांच्या (एमओयुज) माध्यमातून आंतरराष्ट्रीय गतिशीलतेचे बळकटीकरण;(क)नेटवर्कचे विकसन – परदेशांतील व्यावसायिक अध्यायांची घडण आणि विस्तार; आणि (ड)व्यावसायिक सेवा निर्यातीला चालना देण्यासाठी मुक्त व्यापार करारांचा (एफटीएज) वापर या चार सत्रांमध्ये हे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले.

सदर चिंतन शिबिराने व्यावसायिक संस्थांना जागतिक पातळीवरील सर्वोत्तम पद्धतींवर आधारित संकल्पनांचे आदानप्रदान तसेच भारतातील समव्यावसायिकांकडून अनुसरल्या जाणाऱ्या पद्धती याबाबतच्या संकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली. कृत्रिम बुद्धीमत्ता तसेच तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये नव्याने उदयाला येत असलेल्या घडामोडींशी जुळवून घेता येणे सुनिश्चित करण्यासाठी व्यावसायिक संस्थांना व्यावसायिक पद्धतींचे प्रशासन करणाऱ्या विद्यमान नियम आणि नियमनांचे पुनर्परीक्षण करता येईल आणि प्रशिक्षण तसेच कौशल्य अद्यायावतीकरण कार्यक्रमांमध्ये समर्पक बदल घडवता येईल अशी क्षेत्रे निश्चित करण्यात आली. 

या संदर्भात, आयसीएआय प्लेबुकचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. यात गतिमान आणि बाजार-केंद्रित हार्ड आणि सॉफ्ट पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या अंतर्गत अध्याय, आंतरराष्ट्रीय संचालनालय आणि तंत्रज्ञान आणि एआयवर लक्ष केंद्रित करणारे प्रमाणपत्र अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. इतर व्यावसायिक संस्थांना त्यांच्या संबंधित व्यवसायांसाठी हे प्लेबुक कसे अनुकूलित करता येईल याचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. आरोग्य क्षेत्रातील अनेक प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये नियामक आव्हाने लक्षात घेता भारतीय परिचारिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये अधिक प्रवेश/संधि मिळविण्यास सक्षम करण्यासाठी भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली.  उच्च-निष्ठा सिम्युलेशन प्रयोगशाळा, उत्कृष्टता केंद्रे आणि भाषा प्रशिक्षण अभ्यासक्रम यासारख्या चांगल्या पद्धतींचे कौतुक करण्यात आले. व्यावसायिक संस्थांना इतर देशांमधील समकक्षांशी संबंध वाढविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले, यात   परदेशातील भारतीय मिशनद्वारे संबंध उपयुक्त ठरल्याचे दिसून आले.

परस्पर मान्यता करार (एमआरए) वरील चर्चा एमआरए मध्ये प्रवेश करण्याशी संबंधित प्रमुख आव्हानांवर तसेच विद्यमान एमआरए चा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यावर केंद्रित होती. एमआरए च्या प्रभावीतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्पष्ट परिणाम मापदंडांच्या गरजेवर भर देण्यात आला.

भारताच्या क्षेत्रीय नियामक चौकटींना एमआरए करण्यासाठी अधिक 'मान्यता-सज्ज' बनवण्यावरही चर्चा झाली. जागतिक क्षमता केंद्रे आणि डिजिटल पद्धतीने वितरित सेवांच्या जलद स्केलिंगच्या संदर्भात, भारताच्या भविष्यातील व्यावसायिक सेवा निर्यात धोरणात एमआरएची भूमिका देखील विचारात घेण्यात आली.

मुक्त व्यापार कराराचा फायदा घेण्याबाबत, गतिशीलता-संबंधित तरतुदी आणि पात्रता आवश्यकता आणि प्रक्रियांशी संबंधित  देशांतर्गत नियमांव्यतिरिक्त, व्यावसायिक सेवांच्या डिजिटल वितरणाचे भविष्य-उज्वल  करण्यावर चर्चा केंद्रित होती.

भारतात प्रॅक्टिस करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांसाठी भारतीय व्यावसायिक सेवा क्षेत्रात अधिक मोकळेपणा आणण्याच्या गरजेवर भर देण्यात आला जेणेकरून दोन्ही बाजूंनी फायदेशीर परिणाम साध्य होतील. डेटा गोपनीयता आणि संरक्षणाशी संबंधित मुद्दे तसेच परदेशी विद्यापीठांनी भारतात शाखा स्थापन केल्याने उद्भवणाऱ्या संधींवरही चर्चा करण्यात आली.

चिंतन शिबिरातील विचारविनिमयाच्या आधारे, वाणिज्य विभाग, संबंधित भागधारकांच्या सहकार्याने, जागतिक स्तरावर भारतीय व्यावसायिक सेवांचा विस्तार करण्यासाठी योग्य प्रोत्साहन देण्यासाठी ओळखल्या गेलेल्या कृतीविषयक  मुद्द्यांना पुढे नेईल.

***

NehaKulkarni/SanjanaChitnis/HemangiKanekar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2208074) आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil