आयुष मंत्रालय
नवी दिल्लीत डब्ल्यूएचओ जागतिक परिषदेच्या दुसऱ्या दिवशी 16 राष्ट्रांसोबत द्विपक्षीय बैठका घेऊन भारताने पारंपरिक औषध क्षेत्रात आपले जागतिक नेतृत्व अधिक मजबूत केले
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक स्तरावर पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्राला चालना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयसस यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 9:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक स्तरावर पारंपरिक, पूरक आणि एकात्मिक वैद्यकशास्त्राला चालना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांची भेट घेतली.

विज्ञान, संशोधन गुंतवणूक, नवोपक्रम, सुरक्षा, नियमन आणि आरोग्य प्रणालीच्या एकात्मतेवरील उच्चस्तरीय विचारविनिमयामुळे हे शिखर संमेलन निर्णायक टप्प्यावर पोहोचले आणि एका न्याय्य, लवचिक व लोककेंद्रित जागतिक आरोग्य परिसंस्थेमध्ये पारंपरिक औषध प्रणालीचे एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून असलेले महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.






केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नेपाळ, श्रीलंका, मायक्रोनेशिया, मॉरिशस आणि फिजी येथील शिष्टमंडळांसोबत द्विपक्षीय चर्चा केली, तर आयुष मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी उर्वरित देशांशी संवाद साधला. एकूणच, पारंपरिक औषध प्रणालीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालयाने ब्राझील, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका, मायक्रोनेशिया, मॉरिशस, फिजी, केनिया, संयुक्त अरब अमिराती, मेक्सिको, व्हिएतनाम, भूतान, सुरीनाम, थायलंड, घाना आणि क्युबा या देशांच्या शिष्टमंडळांसोबत सोळा द्विपक्षीय बैठका घेतल्या.

याचबरोबर, भारत आणि क्युबा यांच्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) संबंधित संस्था-स्तरीय सामंजस्य करारालाही मुदतवाढ देण्यात आली आहे. या अंतर्गत, आयुर्वेदामध्ये अभ्यासक्रम विकास, सार्वजनिक आरोग्य एकत्रीकरण, पंचकर्म प्रशिक्षण आणि नियामक सुसंगतता या क्षेत्रांमधील सहकार्य पुढे नेण्यासाठी एका संयुक्त कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे.
शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, मोरोक्को, इराण, युगांडा, कॅनडा, स्वित्झर्लंड, अमेरिका, ब्रिटन , कोलंबिया, ब्राझील, भारत, न्यूझीलंड, जर्मनी, नेपाळ, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका येथील तज्ञांनी आपले विचार आणि अनुभव मांडले, ज्यामुळे जागतिक स्तरावर पारंपरिक औषध प्रणालीच्या प्रगतीवर सखोल चर्चा झाली.
या चर्चेत पारंपारिक औषधांना लवचिक आरोग्य व्यवस्था, जैवविविधता व्यवस्थापन आणि समावेशक विकासासाठी एक महत्त्वाचा योगदानकर्ता म्हणून स्थान देण्यात आले, ज्यामुळे शिखर परिषदेच्या धोरणात्मक संवादाच्या शेवटच्या दिवसासाठी आणि सामूहिक जागतिक वचनबद्धतेसाठी एक मजबूत पाया रचला गेला.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206309)
आगंतुक पटल : 14