पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील 'परमवीर गॅलरी'चे केले स्वागत, देशाच्या अदम्य शूरवीरांना दिलेली ही मानवंदना


'परमवीर गॅलरी' ही भारताच्या वसाहतवादी मानसिकतेतून दूर जाऊन नव्या राष्ट्रीय चेतनेकडे झालेला प्रवास प्रदर्शित करते : पंतप्रधान

'परमवीर गॅलरी' तरुणांना भारताच्या शौर्य परंपरेशी आणि राष्ट्रीय संकल्पाशी जोडण्यासाठी प्रेरणा देईल: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 17 DEC 2025 6:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनातील 'परमवीर गॅलरी'चे स्वागत केले आहे. या गॅलरीत प्रदर्शित केलेली चित्रे देशाच्या अदम्य शूरवीरांना मनापासून अर्पण केलेली आदरांजली अजून त्यांच्या बलिदानाबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ही चित्रे त्या शूर योद्ध्यांचा सन्मान करतात,ज्यांनी आपल्या सर्वोच्च त्यागाने मातृभूमीचे रक्षण केले. भारताची एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, असेही त्यांनी नमूद केले.

दोन परमवीर चक्र मानकऱ्यांच्या आणि इतर विजेत्यांच्या कुटुंबीयांच्या सन्माननीय उपस्थितीत परमवीर चक्र विजेत्यांची ही गॅलरी राष्ट्राला समर्पित केल्याने हा प्रसंग अधिकच विशेष ठरला आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

दीर्घकाळापासून राष्ट्रपती भवनातील गॅलरींमध्ये ब्रिटिश काळातील सैनिकांची चित्रे प्रदर्शित केलेली होती, आता त्यांची जागा आता देशाच्या परमवीर चक्र विजेत्यांच्या चित्रांनी घेतली आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रपती भवनात 'परमवीर गॅलरी'ची निर्मिती हे भारताच्या वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडून देशाला नव्या राष्ट्रीय चेतनेशी जोडण्याच्या प्रयत्नाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. काही वर्षांपूर्वी अंदमान आणि निकोबार बेटांमधील अनेक बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली, याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली.

तरुण पिढीसाठी या गॅलरीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, ही चित्रे आणि ही गॅलरी तरुणांना भारताच्या शौर्याच्या परंपरेशी आणि राष्ट्रीय संकल्पाशी जोडण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम म्हणून काम करेल.

ही गॅलरी तरुणांना राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरिक शक्ती आणि दृढनिश्चयाचे महत्त्व ओळखण्याची प्रेरणा देईल,असे ते पुढे म्हणाले आणि त्यांनी आशा व्यक्त केली, की हे स्थान विकसित भारताच्या भावनेचे प्रतीक असलेले एक चैतन्यमय तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येईल.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान म्हणतात,

“हे भारत के परमवीर…

है नमन तुम्हें हे प्रखर वीर !

ये राष्ट्र कृतज्ञ बलिदानों पर…

भारत मां के सम्मानों पर !

राष्ट्रपती भवनाच्या परमवीर गॅलरीमध्ये देशाच्या अजेय वीरांचे हे चित्र आपल्या राष्ट्राच्या संरक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. सर्वोच्च बलिदान देऊन मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या, भारताची एकता आणि अखंडता यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या  वीरांबद्दल राष्ट्राने आणखी एका प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली आहे. दोन परमवीर चक्र विजेत्यांच्या आणि इतर विजेत्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत देशाच्या परमवीरांची ही गॅलरी राष्ट्राला समर्पित केली जाणे हे  विशेष  आहे."

“दीर्घ काळापर्यंत ,राष्ट्रपती भवनाच्या गॅलरीत ब्रिटीशकालीन सैनिकांची छायाचित्रे लावलेली होती. आता त्यांची जागा देशातील परमवीर चक्र विजेत्यांच्या छायाचित्रांनी घेतली आहे. राष्ट्रपती भवनातील परमवीर गॅलरीची निर्मिती ही भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून  एका नवीन चैतन्यदायी वातावरणात नेण्याच्या मोहिमेचे एक उत्तम उदाहरण आहे. काही वर्षांपूर्वी, सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांमधील अनेक बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत.”

“ही चित्रे आणि ही गॅलरी आपल्या तरुण पिढीला भारताच्या शौर्याच्या परंपरेशी जोडून घेण्यासाठी  एक  सामर्थ्यशाली स्थान आहे. राष्ट्राच्या उद्दिष्टांसाठी आत्मविश्वास आणि दृढनिश्चय महत्त्वाचा आहे, अशी प्रेरणा ही गॅलरी तरुणांना देईल.मला आशा आहे की ही जागा  विकसित भारताच्या भावनेसाठी एक चैतन्यशील तीर्थक्षेत्र बनेल."


सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2205478) आगंतुक पटल : 31
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam