अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत गुंतवणूक
उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत मोठी गुंतवणूक, आणि निर्यात वाढीमुळे भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्राला मिळाले मोठे बळ
Posted On:
11 DEC 2025 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025
अन्न प्रक्रिया उद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत, मंजूर अर्जदारांद्वारे 9,207 कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक केली गेली आहे. अन्न प्रक्रिया उद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या लाभार्थ्यांनी मंजूर उत्पादनांसाठी, एप्रिल 2021 या आर्थिक वर्षापासून ते आर्थिक वर्ष सप्टेंबर 2025 पर्यंतच्या कालावधीत 89,053.44 कोटी रुपयांची एकत्रित निर्यात विक्री केली आहे.अन्न प्रक्रिया उद्योगासाठीच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजने अंतर्गत 170 अर्ज मंजूर झाले आहेत. या योजनेअंतर्गत मंजुरीसाठी आता कोणताही अर्ज प्रलंबित नाही.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2202501)
अभ्यागत कक्ष : 24