दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिजिटल संमती उपक्रम (डीसीए) या प्रायोगिक प्रकल्पांतर्गत निवडक (मर्यादित) ग्राहकांना पाठवल्या जाणार एसएमएस सूचना
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्या संयुक्त डिजिटल संमती उपक्रमांतर्गत (डीसीए) प्रचारात्मक संदेशांसाठीची संमती डिजिटल पद्धतीने घेण्याच्या चाचणी प्रकल्पात, दूरसंचार सेवा पुरवठादार (टीएसपी) लवकरच निवडक (मर्यादित) ग्राहकांना एसएमएस सूचना पाठवणार आहेत, असं आज ट्रायने जाहीर केले. हा प्रायोगिक उपक्रम नऊ दूरसंचार सेवा पुरवठादार) आणि अकरा मोठ्या बँकांपासून सुरू होत आहे. यात निवडक ग्राहकांना त्यांनी आधी दिलेली प्रचारात्मक संदेशांसाठीची संमती डिजिटल पद्धतीने पाहता येईल, त्याचं व्यवस्थापन करता येईल आणि ती रद्द करता येईल. या उपक्रमाचा उद्देश दीर्घकाळापासून चालत आलेल्या जुन्या संमती पद्धतींमधील त्रुटी दूर करणे आणि देशभरात उपक्रम लागू करण्यापूर्वी एकसंध डिजिटल संमती पद्धतीची सज्जता तपासणे हा आहे.
सध्याचे नियम – टीसीसीसीपीआर- दूरसंचार व्यावसायिक संवाद ग्राहक पसंती नियमावली, 2018 (Telecom Commercial Communications Customer Preference Regulations, 2018) ग्राहकांना वेगवेगळ्या क्षेत्रातील कॉल करणाऱ्यांच्या श्रेणींवर आधारित प्रचारात्मक कॉल्स आणि संदेश रोखण्याची परवानगी देतात. त्याच वेळी हे नियम ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार विशिष्ट व्यवसाय किंवा संस्थांकडून प्रचारात्मक संदेश स्वीकारण्याची परवानगीही देतात. त्यासाठी नियमांमध्ये डिजिटल संमती नोंदणी ठेवण्याची तरतूद आहे. याचा वापर व्यवसाय संस्थांनी ग्राहकांची संमती नोंदवण्यासाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, आधी कागदावर किंवा ग्राहक केंद्रांवरील डिजिटल प्रणालींमधून घेतलेली जुनी संमती अपलोड करणे कठीण असल्यामुळे हे नियम नीट लागू होऊ शकले नाहीत. यामुळे संमती घेण्याच्या पद्धती तुकड्यातुकड्यात, अस्पष्ट आणि असमान राहिल्या. आतापर्यंत वापरात असलेल्या यंत्रणेत ग्राहकांना त्यांनी दिलेली जुनी संमती पाहण्याची किंवा रद्द करण्याची सोय नव्हती. म्हणूनच, टीसीसीसीपीआर 2018 मध्ये संमतीची चौकट तयार केली असली तरी, जुन्या संमती मोठ्या प्रमाणावर अपलोड करून त्यांची पडताळणी करणे कठीण असल्यामुळे ती पूर्णपणे लागू करता आली नाही.
संमती घेण्याच्या पद्धतींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि ग्राहकांना कोणत्याही वेळी संमती पाहण्याची, व्यवस्थापित करण्याची किंवा रद्द करण्याची क्षमता देण्यासाठी ट्रायने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या) सहकार्याने डिजिटल संमती उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना संमती व्यवस्थापनासाठी एकसंध डिजिटल इंटरफेस उपलब्ध करून देणे आणि ग्राहकांनी संमती रद्द केल्यास प्रचारात्मक संदेश तत्काळ थांबवले जातील याची खात्री करणे हा आहे.
एकूण नऊ दूरसंचार सेवा प्रदाता (टीएसपी) आणि एसबीआय, पीएनबी, अॅक्सिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि पंजाब अँड सिंध बँक, या अकरा बँका पायलट (प्रायोगिक तत्त्वावरील) प्रकल्पात सहभागी होत आहेत. सहभागी टीएसपी आणि बँकांनी गेल्या काही महिन्यांत आवश्यक तांत्रिक विकास आणि सिस्टम इंटिग्रेशन (प्रणाली एकीकरण) पूर्ण केले आहे. बँकांनी आता प्रायोगिक तत्त्वावर स्थापित केलेल्या सामायिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर जुन्या संमतीचे नमुना संच अपलोड करायला सुरवात केली आहे. याशिवाय, सहभागी बँकांनी मिळवलेले नवीन संमती संच देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केले जातील.
नमुना तत्वावर, प्रणाली चाचणीचा भाग म्हणून, ज्या ग्राहकांची जुनी संमती अपलोड केली आहे, त्यांना त्यांच्या संबंधित दूरसंचार सेवा प्रदात्यांनी पाठवलेल्या 127000 शॉर्ट कोड द्वारे एसएमएस सूचना प्राप्त होऊ शकतो. या सूचना केवळ मर्यादित ग्राहकांच्या गटालाच जारी केल्या जातील, ज्यांच्या संमती बँकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्या आहेत, तसेच दूरसंचार सेवा पुरवठादार, बँका आणि संमती नोंदवहीतील मंचाच्या तत्परतेचे मूल्यांकन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. ज्या ग्राहकांना अशा प्रकारचे संदेश मिळत नाहीत, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण पायलट प्रकल्पाची व्याप्ती सध्या मर्यादित आहे, आणि पुढे तो पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची योजना आहे.
प्रत्येक एसएमएसमध्ये एक प्रमाणित सल्ला देणारा संदेश असेल आणि एक सुरक्षित लिंक असेल, ही लिंक ग्राहकाला टीएसपीच्या अधिकृत संमती व्यवस्थापन पृष्ठावर घेऊन जाईल. या पोर्टलद्वारे, ग्राहक त्यांच्या मोबाईल क्रमांकावर या 11 बँकांनी नोंदवलेल्या संमती पाहू शकतील, आणि यापैकी कोणत्याही संमती पुढे चालू ठेवायच्या, सुधारित करायच्या अथवा रद्द करायच्या, हा निर्णय घेऊ शकतील. पोर्टलवर दिसणाऱ्या संमतींमध्ये सहभागी बँकांनी अपलोड केलेल्या सर्व जुन्या संमती प्रतिबिंबित होतील. कोणत्याही टप्प्यावर कोणतीही वैयक्तिक अथवा आर्थिक माहिती मागितली जाणार नाही, आणि ग्राहकांना केवळ 127000, या शॉर्ट कोडवरून आलेल्या एसएमएसवरच कारवाई करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या एसएमएसवर ग्राहकांकडून कारवाई ऐच्छिक असेल. तथापि, जर त्यांना पोर्टलवर प्रदर्शित केलेल्या त्यांच्या संमतींमध्ये बदल करायचे असतील तर ते तसे करू शकतील.
शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201936)
आगंतुक पटल : 11