नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिगो परिचालन संकटावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची कारवाई - विमानाच्या भाड्याचे कठोर नियमन


सर्व प्रभावित मार्गांवर वाजवी आणि उचित भाडे सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाने त्यांच्या नियामक अधिकारांचा केला वापर

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2025 12:25PM by PIB Mumbai

 

सध्या सुरू असलेल्या विमानवाहतुकीमध्ये व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांकडून जरुरीपेक्षा जास्त विमानभाडे आकारले जात असल्याची  गंभीर दखल नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतली आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटामुळे भाड्याच्या किंमतींपासून प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी, मंत्रालयाने सर्व प्रभावित मार्गांवर योग्य आणि वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या नियामक अधिकारांचा वापर केला आहे.

सर्व विमान कंपन्यांना अधिकृत निर्देश जारी करण्यात आले आहेत ज्यात आता निर्धारित केलेल्या भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. परिस्थिती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत हे मर्यादा लागू राहतील. या निर्देशाचे उद्दिष्ट बाजारात विमान भाड्याच्या रकमेत  शिस्त राखणे, संकटात असलेल्या प्रवाशांचे कोणत्याही प्रकारचे शोषण रोखणे आणि ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांसह ज्यांना तातडीने प्रवास करण्याची आवश्यकता आहे अशा नागरिकांना - या काळात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये सुनिश्चित  करणे हे आहे.

मंत्रालय रिअल-टाइम डेटा आणि विमान कंपन्या आणि ऑनलाइन प्रवासी यंत्रणेशी सक्रिय समन्वय साधत भाडे पातळीचे बारकाईने निरीक्षण करत राहील. निर्धारित नियमांविरुद्ध  कोणतेही विचलन झाल्यास व्यापक सार्वजनिक हितासाठी त्वरित सुधारणात्मक कारवाई केली जाईल.

***

नेहा कुलकर्णी/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2199799) आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Tamil , Telugu , Malayalam