रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2024 आणि 2025 मध्ये अधिसूचित 1,20,579 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; मागील 11 वर्षात रेल्वेने 5.08 लाख जणांना दिल्या नोकऱ्या : अश्विनी वैष्णव


पेपरफुटी इतर कोणताही गैरप्रकार नाही, आणि परीक्षेबाबत कसलाही संभ्रम निर्माण न होऊ देता, रेल्वेने 59,678 पदांसाठी प्रथम/एकल टप्प्यातील संगणक आधारित चाचण्या केल्या पूर्ण

प्रविष्टि तिथि: 03 DEC 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025

भारतीय रेल्वेचा आकार, भौगोलिकदृष्ट्या असलेला विस्तार आणि कामकाजाविषयीचे  गां‍भीर्य लक्षात घेवून,  रिक्त पदे निर्माण होणे आणि त्यांची भरती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. नियमित कामकाज, तंत्रज्ञानातील बदल, यांत्रिकीकरण आणि नवोन्मेषी पद्धतींच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तेवढे आणि योग्य मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येते. रिक्त पदे प्रामुख्याने रेल्वेकडून भरती संस्थांकडे कार्यात्मक आणि तांत्रिक गरजेनुसार मागणी पाठवून भरली जातात.

सध्या भारतीय रेल्वेमध्ये 2024 आणि 2025 च्या वार्षिक दिनदर्शिकेनुसार 1,20,579 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

स्तर-1 श्रेणीतील 32,438 रिक्त पदांसाठी संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) 27.11. 2025 पासून 140 शहरांमध्ये 15 भाषांमध्ये सुरू झाली आहे. रेल्वे संरक्षण दलासाठी (आरपीएफ) हवालदार (कॉन्स्टेबल) पदाच्या 4,208 रिक्त पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी (पीईटी) 13.11.2025 पासून सुरू झाली.

तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, पॅरामेडिकल श्रेणी, उपनिरीक्षक (आरपीएफ) आणि सहाय्यक लोको पायलट या पदांसह विविध पदांसाठी 23,000 हून अधिक उमेदवारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. त्यापैकी बहुतांश पदे सुरक्षेशी संबंधित आहेत.

याशिवाय, 2025 च्या वार्षिक दिनदर्शिकेनुसार 28,463 रिक्त पदांसाठी सात केंद्रीकृत रोजगार अधिसूचना (CENs) देखील जारी करण्यात आल्या आहेत:

रेल्वे भरती बोर्डाच्या अत्यंत परीक्षा तांत्रिक स्वरूपाच्या असतात ज्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ, संसाधनांची तजवीज आणि प्रशिक्षण आवश्यक असते. रेल्वेने या सर्व आव्हानांवर मात केली आणि सर्व निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पेपरफुटी किंवा तत्सम गैरव्यवहाराची कोणतीही घटना घडली नाही.

2004-2005 ते 2013-2014 दरम्यान भारतीय रेल्वेमध्ये झालेली भरती आणि 2014-2015 ते 2024-2025 दरम्यान झालेल्या भरतीची माहिती खालीलप्रमाणे आहे:-

Period

Recruitments

2004-2005 to 2013-2014

4.11 lakhs

2014-2015 to 2024-2025

5.08 lakhs

ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.


सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2198515) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , Odia , English , Urdu , हिन्दी