आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते विज्ञान भवनात जागतिक एड्स दिन 2025 कार्यक्रमाचे उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 01 DEC 2025 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025

सार्वजनिक आरोग्याला असलेला एड्स रोगाचा धोका संपवण्याप्रती प्रगतीला वेग देण्याच्या भारताच्या कटिबद्धतेची पुष्टी करत आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश  नड्डा यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित जागतिक एड्स दिन 2025 च्या राष्ट्रीय  कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

याप्रसंगी केलेल्या बीजभाषणात केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की हा दिवस आपल्या कटिबद्धतेला आणखी बळकट करण्याचा, भूतकाळात मिळालेल्या धड्यांबाबत विचार करण्याचा आणि वर्तमानकाळ तसेच भविष्यकाळासाठी परिणामकारक नीतींचा स्वीकार करण्याचा महत्त्वाचा क्षण आहे . राष्ट्रीय एड्स आणि एसटीडी नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत भारताने केलेली शाश्वत प्रगती अधोरेखित करत त्यांनी हक्कांवर आधारित ,  कलंक-मुक्त आणि समावेशक एचआयव्ही प्रतिसादाप्रती सरकारच्या समर्पिततेचा पुनरुच्चार केला.



 

भारताचे नवीनतम प्रगती निदर्शक सामायिक करत, केंद्रीय मंत्री नड्डा यांनी अधोरेखित केले की, भारताने नव्या एचआयव्ही संसर्गाच्या घटनांमध्ये 35% घट (जागतिक पातळीवरील 32%च्या तुलनेत) साध्य करून दाखवली आहे आणि एचआयव्ही-संबंधित मृत्यूंच्या प्रमाणात जागतिक पातळीवरील केवळ 37% घट लक्षात घेता त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 69% घट साध्य केली आहे. ते पुढे म्हणाले की, भारत केवळ स्वतःच्या देशातील लोकांचे संरक्षण करत नसून विश्वभरात परवडण्याजोग्या आणि दर्जेदार औषधांचा पुरवठा करून जगाला देखील एड्स नियंत्रणात मदत करत आहे.

जागतिक एड्स दिनाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी आज युवा जागरुकता; एचआयव्ही आणि सिफिलीस या रोगांचे  निर्मूलन; आणि बाधितांच्या बाबतीत कलंक आणि भेदभाव संपवणे अशा तीन संकल्पनांवर आधारित राष्ट्रीय मल्टीमिडीया अभियान देखील सुरु केले.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमात वैशिष्ट्यपूर्ण सेवा आणि दीर्घकालीन योगदान देणाऱ्या तीन प्रख्यात ज्येष्ठ तांत्रिक तज्ञांना  केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याच सोबत, दोन एचआयव्हीग्रस्त व्यक्तींचा देखील त्यांनी सत्कार केला. या दोन व्यक्तींनी एड्स रोगाशी दोन हात करण्यात लक्षणीय प्रगती साध्य करून दाखवली आहे.

सुषमा काणे/संजना ‍चिटणीस/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

(रिलीज़ आईडी: 2197317) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English