दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डिटवाह चक्रीवादळासाठी दूरसंचार विभागाकडून सज्जतेच्या उपाययोजना
डिटवाह चक्रीवादळ्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षित दूरसंचार संपर्कासाठी दूरसंचार विभागाकडून 24×7 नियंत्रण कक्षाची उभारणी
प्रविष्टि तिथि:
30 NOV 2025 10:24AM by PIB Mumbai
बंगालच्या उपसागरामध्ये असलेले डिटवाह चक्रीवादळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारी भागाला धडकण्याची शक्यता असल्याने, दूरसंचार संपर्कजाळे सुरळीत राहाण्यासाठी दूरसंचार विभागाने व्यापक तयारी करत उपाययोजना केल्या आहेत.
डिटवाह चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता, दूरसंचार संपर्क सुरक्षित राहाण्यासाठी, सेवा प्रदात्यांशी समन्वय साधण्यासाठी तसेच जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे त्वरीत प्रतिसाद मिळावा यासाठी दूरसंचार विभागाकडून 24×7 नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.
सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांना अखंडीत नेटवर्क कार्यचालन, पुरेसा इंधनसाठा, आपत्कालीन वीजपुरवठ्याची तयारी आणि संवेदनशील जिल्ह्यांमध्ये क्षेत्र प्रतिसाद गट तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मानक कार्यप्रणाली (एसओपी 2020)नुसार, दूरसंचार विभागाने संपर्क सातत्य आणि आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणाऱ्या पूर्वसूचनांसाठी सर्व नेटवर्कवर इंट्रा सर्कल रोमिंग (आयसीआर) आणि सेल ब्रॉडकास्ट (सीबी) चाचणी पूर्ण झाल्याची खात्री केली आहे. डिटवाह चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर, दूरसंचार संपर्कजाळ्याचा बळकटपणा सुनिश्चित केला आहे. चक्रीवादळादरम्यान आणि त्यानंतरही अखंडीत संपर्क सुनिश्चित करण्यासाठी दूरसंचार विभाग नियंत्रण कक्षाद्वारे आणि सेवा प्रदात्यांकडून नियमित अद्ययावत माहितीच्या आधारे परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहे.
***
सुषमा काणे/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2196549)
आगंतुक पटल : 19