लिटील ट्रबल गर्ल्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर अर्थात सिल्वर पिकॉक पुरस्कार जारा सोफिजा ओस्टनला मिळाला
अभिव्यक्ती आणि भावनात्मक सत्य यात रुजलेल्या अद्वितीय कामगिरीवर ज्युरींनी उमटवली मोहोर
सूक्ष्म भावमुद्रा, हालचाली आणि जागृतीतून उलगडलेला प्रवास
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2025
56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्लोव्हेनियन चित्रपट 'लिटिल ट्रबल गर्ल्स' मधील अभिनयासाठी जारा सोफिजा ओस्टन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) चा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिल्व्हर पीकॉक करंडक, गुणवत्ता प्रमाणपत्र आणि 10,00,000 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, इफ्फी ज्युरीचे अध्यक्ष राकेश ओमप्रकाश मेहरा आणि महोत्सवाचे संचालक शेखर कपूर उपस्थित होते. जारा सोफिजा ओस्टन यांनी अत्यंत सूक्ष्म रीतीने लहान लहान बदलांमधून भावना जिवंत केल्या असून त्यांचा चेहरा एखाद्या पुस्तकासारखा वाचता येतो असे मत ज्युरींनी व्यक्त केले.

जारा यांचे प्रत्येक उल्लेखनीय सूक्ष्म हावभाव आणि खोलवर व्यक्त होणाऱ्या अदाकारीमुळे आपण जणू काही एखादे पुस्तक वाचत आहोत, असे वाटल्याचे ज्युरींनी सांगितले. अतिशय साध्या, अतिशय प्रामाणिक आणि सूक्ष्म भावमुद्रांमधून आणि अत्यंत नाजूक हालचालींतून खूप काही सांगितले जाते — आणि न बोललेले राहते ते पूर्ण करण्यासाठी आपल्यालाच आमंत्रण दिले जाते, असे ज्युरी म्हणाले. आपल्याला एका छोट्याशा मात्र नंतर मोठ्या होत जाणाऱ्या प्रवासात साथ करताना एक तरुण मुलगी इच्छा, धैर्य आणि सरतेशेवटी स्व चा शोध घेते. या एका अद्वितीय अशा अचूकतेसाठी आणि भावनिक सत्यासाठी आम्ही जारा सोफिजा ओस्टन यांना सन्मानित करत आहोत.
या सन्मानामुळे लिटल ट्रबल गर्ल्स चे सादरीकरण 56व्या IFFIमध्ये गौरवण्यात आलेल्या सर्वात शांतपणे प्रभावी ठरलेल्या अभिनयांपैकी एक ठरते—ज्याची ओळख आवाजाने नव्हे, तर त्यातील खोली, शांतता आणि आंतरिक भावनांनी निश्चित होते.
लिटल वुमनचा सारांश

स्लोव्हेनियातील एका कॅथोलिक शाळेत शिकणारी शांत विद्यार्थिनी असलेली सोळा वर्षांची लुसिया तिच्या आईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या शाळेच्या सर्व मुलींच्या गायनगटात सामील होते. अॅना-मारिजा, या एका उत्साही आणि आत्मविश्वासू मोठ्या वर्गातील विद्यार्थिनीशी तिचे बंध लगेच जुळतात, ज्यामुळे एक घनिष्ठ मैत्री निर्माण होते, या मैत्रीमुळे लुसिया नवीन भावना आणि अनुभवांना सामोरे जाते. दूरवरच्या मठातील वसंत ऋतूतील निवांत मुक्कामादरम्यान, लुसीया एका तरुण पुनर्स्थापन कार्यकर्त्याकडे आकर्षित होते, ज्यामुळे अॅना-मरीजासोबत तणाव निर्माण होतो आणि गायनगटात विसंवाद निर्माण होऊ लागतो. कडक धार्मिक वातावरणात लुसीया स्वतःच्या लैंगिकतेचा शोध घेत असताना, तिला लज्जा, संभ्रम आणि अपराधीपणाशी झुंज द्यावी लागते. यामुळे तिच्या श्रद्धांबद्दल तसेच तिच्या समवयस्कांमध्ये स्वतःच्या स्थानाबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागतात.
लिटील ट्रबल गर्ल्स च्या पत्रकार परिषदेची लिंक:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | आशिष सांगळे/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2196330
| Visitor Counter:
7