संरक्षण मंत्रालय
‘तारागिरी’ - निलगिरी श्रेणीतील (प्रकल्प 17अ) चौथे प्रगत स्वदेशी जहाज नौदलाकडे सुपूर्द
Posted On:
29 NOV 2025 11:00AM by PIB Mumbai
तारागिरी (यार्ड 12653), निलगिरी श्रेणीतील (प्रकल्प 17अ) मधील चौथे जहाज आणि माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) द्वारे बांधलेले तिसरे जहाज, 28 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत एमडीएल येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. युद्धनौकेच्या डिझाइन आणि बांधकामातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे हे मोठे पाऊल आहे. प्रकल्प 17अ फ्रिगेट्स हे बहुमुखी बहु-उन्मुख मोहिमांसाठी तयार केलेली जहाजे असून सागरी क्षेत्रातील विद्यमान आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांची रचना करण्यात आली आहे.
तारागिरी हे पूर्वीच्या आयएनएस तारागिरीचे नवे रूप आहे, जे एक लिएंडर-क्लास फ्रिगेट होते जे 16 मे 1980 ते 27 जून 2013 पर्यंत भारतीय नौदलाच्या ताफ्याचा भाग होते आणि त्यांने देशासाठी 33 वर्षे गौरवशाली सेवा दिली. नव्या पिढीचे हे अत्याधुनिक जहाज नौदल डिझाइन, स्टेल्थ, अग्निशक्ती, स्वयंचलन आणि टिकाऊपणाच्या क्षमतेतील एक मोठी झेप दर्शवत असून ते युद्धनौका बांधणीतील आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे.
वॉरशिप डिझाइन ब्युरो (WDB) यांनी यांचे डिझाइन केलेले असून युद्धनौका देखरेख टीम (मुंबई) च्या देखरेखीखालील , P17A फ्रिगेट्स हे स्वदेशी जहाज डिझाइन, स्टेल्थ, टिकाऊपणा आणि युद्धक्षमतांमध्ये पिढीजात प्रगतीचे प्रतीक आहे. एकात्मिक बांधकामाच्या तत्त्वज्ञानावर आधारित, हे जहाज निर्धारित वेळेत बांधून नौदलाकडे सुपूर्द केले गेले.
P17A जहाजे P17 (शिवालिक) वर्गाच्या तुलनेत प्रगत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर प्रणालीने सुसज्ज आहेत. या जहाजांमध्ये कम्बाइंड डिझेल किंवा गॅस (CODOG) प्रोपल्शन प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीत डिझेल इंजिन आणि प्रत्येक शाफ्टवर कंट्रोलेबल पिच प्रोपेलर (CPP) चालवणारे गॅस टर्बाइन आणि अत्याधुनिक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (IPMS) यांचा समावेश आहे.
शक्तिशाली शस्त्रास्त्र आणि सेन्सर्स संचामध्ये ब्रह्मोस SSM, MFSTAR आणि MRSAM प्रणाली, 76मीमी SRGM, 30मीमी आणि 12.7मीमी क्लोज-इन वेपन सिस्टीमचा समावेश आहे. याशिवाय पाणबुडीविरोधी युद्धासाठी रॉकेटस् आणि टॉर्पेडो देखील जहाजावर बसवलेले आहेत.
(2)RYXP.jpeg)
(2)BD9E.jpeg)
(1)UQDP.jpeg)
***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2196293)
अभ्यागत कक्ष : 89