राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्‍ये भारतीय लष्कराच्या 'चाणक्य संरक्षण संवाद-2025' परिसंवादाच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन


ऑपरेशन सिंदूरचे यश म्हणजे आपल्या दहशतवादविरोधी आणि प्रतिबंधात्मक धोरणातील निर्णायक क्षण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 27 NOV 2025 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2025

आज (27 नोव्हेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित भारतीय लष्कराच्या तिसऱ्या सत्राच्या 'चाणक्य संरक्षण संवाद-2025' या चर्चासत्राच्या उद्घाटन सत्राला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय सशस्त्र दलांनी भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करताना व्यावसायिकता आणि देशभक्तीचे उदाहरण दिले आहे. प्रत्येक सुरक्षा आव्हानादरम्यान, मग ते पारंपरिक, बंडखोरीविरोधी किंवा मानवतावादी असे कोणतेही असो, आपल्या सैन्याने उल्लेखनीय अनुकूलता आणि दृढनिश्चय दाखवला आहे.

ऑपरेशन सिंदूरचे अलिकडचे यश म्हणजे आपल्या दहशतवादविरोधी तसेच प्रतिबंधात्मक धोरणातील एक निर्णायक क्षण आहे. जगाने केवळ भारताच्या लष्करी क्षमतेचीच नव्हे तर शांततेच्या शोधात दृढ, परंतु जबाबदारीने कार्य करण्याच्या भारताच्या नैतिक स्पष्टतेचीही दखल घेतली आहे.

राष्ट्रपतींनी नमूद केले की, सैन्याकडून तरुणाई आणि मानवी विकास यांच्यामध्‍ये भांडवल म्हणून गुंतवणूक करत आहे. शिक्षण, एनसीसी विस्तार आणि खेळांद्वारे ते तरुणांमध्ये देशभक्ती निर्माण करत आहे. तरुण महिला अधिकारी आणि सैनिकांच्या भूमिका आणि चारित्र्य या दोन्ही बाबतीत योगदानाचा विस्तार समावेशकतेच्या भावनेला चालना देईल यावर त्यांनी भर दिला. यामुळे अधिक तरुणींना भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी आणि इतर व्यवसाय स्वीकारण्यास प्रेरणा मिळेल. राष्‍ट्रपती मुर्मू यांनी सांगितले की, ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आपली संस्कृती असल्याचे आपण दाखवून स्पष्‍ट केले आहे की, धोरणात्मक स्वायत्तता जागतिक जबाबदारीसह एकत्र राहू शकते.

राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला की, चाणक्य संरक्षण संवाद-2025 ची चर्चा आणि निष्कर्ष यामुळे धोरणकर्त्यांना आपल्या राष्ट्रीय धोरणाला भविष्यातील रूपरेषेचा आकार देण्यासाठी मौल्यवान अंतर्दृष्टी मिळू शकेल. त्यांनी असाही विश्वास व्यक्त केला की आपली सशस्त्र दले उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करत राहतील आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी संकल्प आणि दृढनिश्चयाने पुढे जातील.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2195373) Visitor Counter : 10